इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा 50वा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात शनिवारी (दि. 6 मे) पार पडला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवरील या सामन्यात आरसीबी संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने खास विक्रम नावावर केला. विराट हा आयपीएलमध्ये 7000 धावांचा टप्पा पार करणारा पहिला-वहिला खेळाडू बनला. मात्र, विराटने हा विक्रम करताना कोणत्या संघाविरुद्ध किती धावा चोपल्या होत्या, हे माहितीये का? नसेल, तर या लेखातून आपण त्याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात…
दिल्ली विरुद्ध बेंगलोर संघातील या सामन्यात बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी बेंगलोरकडून डावाची सुरुवात करण्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) मैदानात उतरले होते. यावेळी विराटने डावातील दुसऱ्या षटकानंतर 11 चेंडूत 12 धावा केल्या. या धावा करताच त्याने आयपीएल इतिहासात 7000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम नावावर केला. विराटच्या आता 7043 धावा झाल्या आहेत.
7⃣0⃣0⃣0⃣ 𝗜𝗣𝗟 𝗥𝗨𝗡𝗦 𝗙𝗢𝗥 𝗞𝗜𝗡𝗚 𝗞𝗢𝗛𝗟𝗜! 👑@imVkohli becomes the first batter to surpass this milestone in IPL 🫡
TAKE. A. BOW 👏#TATAIPL | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/VP4dMvLTwY
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
कोणत्या संघाविरुद्ध किती धावा?
आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण करताना विराट कोहली याने दिल्ली कॅपिटल्स या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध 1000हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच, विराटने आयपीएलमध्ये दिल्लीनंतर चेन्नई सुपर किंग्स या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने चेन्नईविरुद्ध तब्बल 985 धावा चोपल्या आहेत. त्यानंतर संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स या संघांविरुद्ध विराटने प्रत्येकी 861 धावा केल्या आहेत.
At the 7️⃣0️⃣0️⃣0️⃣ summit 🏔️
First player in IPL history to reach the feat! 👑#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #DCvRCB @imVkohli pic.twitter.com/UJ6Tvpm9Ww
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 6, 2023
याव्यतिरिक्त विराटने चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध 651 धावा केल्या आहेत. त्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्ध 600 धावा, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 569 धावा, डेक्कन चार्जर्सविरुद्ध 306 धावा, गुजरात लायन्सविरुद्ध 283 धावा, रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाविरुद्ध 271 धावा, गुजरात टायटन्सविरुद्ध 131 धावा, पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध 128 धावा, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 117 धावा आणि कोची टस्कर्स केरलाविरुद्ध 50 धावा चोपल्या आहेत.
विराटचे 50वे अर्धशतक
विशेष म्हणजे, या विक्रमासोबतच विराट कोहलीने आणखी एक पराक्रम गाजवला. विराटने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 15 षटकांच्या खेळानंतर 46 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. यासह त्याने आयपीएल इतिहासातील 50वे अर्धशतकही पूर्ण केले.
विराट कोहलीच्या 7000हून अधिक धावा (संंघांनुसार)
1008* – दिल्ली कॅपिटल्स
985 – चेन्नई सुपर किंग्स
861 – कोलकाता नाईट रायडर्स
861 – पंजाब किंग्स
851 – मुंबई इंडियन्स
600 – राजस्थान रॉयल्स
569 – सनरायझर्स हैदराबाद
306 – डेक्कन चार्जर्स
283 – गुजरात लायन्स
271 – रायझिंग पुणे सुपरजायंट्स
131 – गुजरात टायटन्स
128 – पुणे वॉरियर्स इंडिया
117 – लखनऊ सुपर जायंट्स
50 – कोची टस्कर्स केरला
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठव्या सामन्यात कॉमेंटेटर, दहाव्या सामन्यात खेळाडू; RCBकडून 38 वर्षीय केदारला कमबॅकची संधी
राजधानीत टॉस जिंकत बेंगलोरचा फलंदाजाची निर्णय, संघात केदार जाधवची एन्ट्री; पाहा प्लेइंग इलेव्हन