टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022मध्ये तिसावा सामना रविवारी (30 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. ऑस्ट्रेलियातील पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकला. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चुकल्याचे लक्षात आले. कारण भारताची स्थिती 7.3 षटकातच 3 विकेट्स 42 अशी झाली. यावेळी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा देखील 12 धावा करत तंबूत परतला, मात्र त्याने केलेल्या धावा विश्वविक्रमी ठरल्या आहेत.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संथ सुरूवात केली होती. केएल राहुल (KL Rahul) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी नंतर फटकेबाजी केली, मात्र राहुल 9 आणि रोहित 15 धावा करत विकेट गमावून बसले. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने दोन चौकार मारत उत्तम सुरूवात केली होती. या सामन्यापूर्वी त्याच्या टी20 विश्वचषकात 21 डावांमध्ये 989 धावा होत्या. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 धावा करताच टी20 विश्वचषकात 1000 धावांचा टप्पा गाठला. यामुळे तो टी20 विश्वचषकात 1000 धावा करणारा भारताचा पहिला आणि क्रिकेटविश्वात दुसरा खेळाडू ठरला आहे.
टी20 विश्वचषकात श्रीलंकेच्या माहेला जयवर्धने याने 31 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 39.07च्या सरासरीने 1016 धावा करण्याचा पराक्रम केला. तो टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या पुरूष खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याच्यानंतर आता विराटचा क्रमांक लागलो. त्याने 24 सामन्यांच्या 22 डावांमध्ये 1001 धावा केल्या आहेत. त्याने या धावा 83.41च्या सरासरीने आणि 12 अर्धशतकांच्या सहाय्याने केल्या आहेत.
विराटने 2014 (6 सामन्यात 319 धावा) टी20 विश्वचषकाच्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या होत्या. तसेच तो 2014 आणि 2016 मध्ये मालिकावीरही ठरला होता. 2016च्या टी20 विश्वचषकाच्या हंगामात त्याने 5 सामन्यात 136.50च्या सरासरीने 273 धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटला लुंगी एनगिडी याने कगिसो रबाडाकरवी झेलबाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदानात पाऊल ठेवताच रोहित बनला टी20 विश्वचषकाचा ‘इतिहासपुरूष’! 15 वर्षापासून दाखवलेलं सातत्य आलं कामी
ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा बुमराहला ‘यॉर्कर’! म्हणाला, ‘क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अधिक काळ खेळणार….’