पुणे। भारत विरुद्ध विंडीज संघात शनिवारी(27 आॅक्टोबर) तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली.
त्याने या सामन्यात 119 चेंडूत 107 धावा केल्या. यात त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारले. हे त्याचे वनडेतील 38 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण 62 शतक होते. याबरोबरच विराटने जॅक कॅलिसच्या 62 शतकांच्या विक्रमांशी बरोबरी केली आहे.
त्यामुळे विराट आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कॅलिससह चौथ्या क्रमांकावर आला आहे. विराटने ही 62 शतके 388 डावात पूर्ण केली आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कुमार संगकाराच्या 63 शतकांपासून एकच शतक दूर आहे. त्यामुळे विराटला संगकारालाही मागे टाकण्याची संधी आहे.
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 100 शतकांसह या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ 71 शतकांसह आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉटींग आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू:
100 – सचिन तेंडुलकर
71 – रिकी पॉटींग
63 – कुमार संगकारा
62 – जॅक कॅलिस
62* – विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप 5: कर्णधार विराट कोहलीने पुण्यात झालेल्या वनडेत केले हे खास विक्रम
–असा ‘विराट’ पराक्रम करणारा कर्णधार कोहली ठरला पहिलाच क्रिकेटपटू
–भारत ‘क’ने पटकावले देवभर ट्रॉफीचे विजेतेपद; अजिंक्य रहाणे ठरला विजयाचा हिरो