ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ आपला दुसरा सामना गुरुवारी (27 ऑक्टोबर) नेदरलँड्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांची नजर विराट कोहली (Virat Kohli) याच्यावर असेल. पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी केलेल्या विराटची सिडनीच्या मैदानावरील आजवरची आकडेवारी देखील अतिशय जबरदस्त आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात फलंदाज असलेल्या विराट कोहलीने सिडनीच्या ऐतिहासिक सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आतापर्यंत एकूण 4 टी20 सामने खेळले असून, त्यात त्याने 78.66 च्या शानदार सरासरीने 236 धावा केल्या आहेत. टी20 क्रिकेटमध्ये या मैदानावर कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. या यादीत विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांपेक्षाही खूप पुढे आहे. सिडनीमध्ये सर्वाधिक टी20 धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहलीच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचे नाव आहे. त्याने या मैदानावर एक शतक आणि एका अर्धशतकासह 186 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड आणि शिखर धवन यांचेही नाव पहिल्या पाच फलंदाजात येते. केवळ सरासरीचाच विचार केल्यास या यादीत भारताच्या हार्दिक पंड्या याचा दुसरा क्रमांक लागतो. त्याची या मैदानावरील सरासरी 62.02 अशी जबरदस्त आहे.
पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवलेल्या भारतीय संघाकडे या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचण्याचे आव्हान असेल. मात्र, सामन्यावर पावसाचे सावट देखील असल्याचे सांगण्यात येत आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, रिषभ पंत, अक्षर पटेल, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक नेदरलँड्सविरूद्ध खेळणार का? गोलंदाजी प्रशिक्षकांनी स्वतः केला खुलासा
भारत-नेदरलँड्स सामन्यात पाऊस बनणार का खलनायक? असा असेल सिडनीचा मौसम