साउथँम्पटन। आज(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात होत आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 224 धावा करत अफगाणिस्तान समोर विजयासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले आहे.
भारताकडून आज कर्णधार विराट कोहलीने 63 चेंडूत 67 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे. ही भारताच्या डावातील सर्वोच्च खेळी ठरली. याबरोबर या विश्वचषकातील विराटचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. त्याने या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 82 धावांची आणि पाकिस्तान विरुद्ध 77 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.
त्यामुळे विश्वचषकामध्ये सलग तीन डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा विराट हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी 1992 च्या विश्वचषकात मोहम्मद अझरुद्दीनने भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना विंडीज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध अर्धशतकी खेळी केल्या होत्या.
याबरोबरच विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक सलग डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम सध्या नवज्योत सिंग सिद्धू आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. त्यांनी विश्वचषकातील सलग चार डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
सिद्धू यांनी 1987 च्या विश्वचषकात हा पराक्रम केला होता. तर सचिनने असा पराक्रम दोन वेळा केला आहे. त्याने 1996 च्या विश्वचषकात आणि 2003 च्या विश्वचषकात सलग 4 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर विश्वचषकात सलग तीन डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी भारताकडून रोहित शर्मा, राहुल द्रविड, युवराज सिंग, सुनील गावसकर, मोहम्मद अझरुद्दीन आणि विराट कोहलीने केली आहे.
आजच्या सामन्यात विराट व्यतिरिक्त केदार जाधवने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नाईबने आणि मोहम्मद नाबीने प्रत्येकी 2 विकेट घेतली; तसेच राशिद खान, रेहमत शहा, मुजीब उर रेहमान आणि अफताब आलमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक सलग डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
4 – नवज्योत सिंग सिद्धू – 1987
4- सचिन तेंडुलकर – 1996
4 – सचिन तेंडुलकर – 2003
3 – मोहम्मद अझरुद्दीन – 1992
3 – सुनील गावसकर – 1987
3 – राहुल द्रविड – 1999
3 – युवराज सिंग – 2011
3 – रोहित शर्मा – 2019
3 – विराट कोहली – 2019*
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदाच घडली अशी घटना!
–एमएस धोनीच्या बाबतीत केवळ दुसऱ्यांदाच घडली अशी गोष्ट
–इंग्लंडमध्ये सचिन-द्रविड नंतर विराट कोहलीनेही केला तो खास विक्रम