---Advertisement---

IND vs AUS; स्लेजिंग मूडमध्ये विराट कोहली, ऑस्ट्रेलिया फलंदाजांना केले तंग

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 10:22 PM
---Advertisement---

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीतील (Border Gavaskar Trophy) दुसरा कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानावर खेळला गेला. ॲडलेड कसोटीत पहिल्या दिवसानंतर ऑस्ट्रेलियन संघ खूप आनंदात असेल. प्राणघातक गोलंदाजीने त्याने प्रथम भारताला 180 धावांवर रोखले. नंतर फलंदाजीतही चांगली सुरूवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रलियाने संघाने 1 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या.

दरम्यान विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. ज्यामध्ये तो नॅथन मॅकस्वीनीला (Nathan McSweeney) ट्रोल करताना दिसत आहे. उस्मान ख्वाजाची (Usman Khawaja) विकेट लवकर पडली होती. मात्र त्यानंतर एकही विकेट न मिळाल्याने भारतीय संघ निराश दिसत होता.

या निराशेदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) अनेकवेळा कर्णधार रोहित शर्माशी (Rohit Sharma) बोलताना दिसला. कोहलीही मैदानावर खूप सक्रिय दिसत होता. स्लिपमध्ये उभा राहून गोलंदाजांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होता. एका प्रसंगी जसप्रीत बुमराहचा चेंडू नॅथन मॅकस्विनीच्या बॅटच्या अगदी जवळून गेला. यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण झाला. त्यानंतर फलंदाजाकडे धाव घेत असताना कोहली म्हणाला, “त्याला (जसप्रीत बुमराह) सारखी कल्पना नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

मोहम्मद सिराजने मोडला शोएब अख्तरचा वेगवान चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम?
IND vs AUS; “रोहितचा पुढचा पाय अडकला…” ऑस्ट्रेलिया दिग्गजाने रोहितच्या जखमेवर चोळले मीठ
“या कारणामुळे कसोटीत तुझी सरासरी 50च्या खाली गेली”, संजय मांजरेकरांचा कोहलीला सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---