टी२० विश्वचषक २०२१ मधील भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. भारतीय संघ स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये पोहोचू शकला नाही. परिणामी आता भारतीय संघाला त्यांचे सुपर १२ फेरीतील सामने पूर्ण झाल्यानंतर माघारी परतावे लागणार आहे. सोमवारी (८ नोव्हेंबर) भारतीय संघाने त्यांचा टी२० विश्वचषकातील शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळला. या सामन्यात भारताने ९ विकेट्स राखून विजय मिळवला.
स्पर्धेचा शेवट गोड होणे कर्णधार विराट कोहलीसाठी महत्वाचे होते. कारण विराट यापुढे टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. अशातच विराटने टी२० कर्णधार म्हणून शेवटच्या सामन्यांतर सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
कर्णधार विराटने यापूर्वीच घोषणा केली होती की, तो टी२० विश्वचषकातनंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. त्यानंतर आता भारतीय संघासाठी हा टी२० विश्वचषक संपलेला आहे आणि चाहत्यांना विराट आता टी२० कर्णधाराच्या रूपात दिसणार नाही. विराटसाठी हा टी२० विश्वचषक खास होता, पण संघाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. अशात विराटने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक खास आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
विराटने या पोस्टमध्ये चार फोटो शेअर केले आहेत. त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी निघालो होतो. दुर्दैवाने आम्ही कमी पडलो आणि यामुळे एक संघ म्हणून आमच्यापेक्षा कोणीही जास्त निराश नसेल. तुमच्या सर्वांकडून मिळालेला पाठिंबा अप्रतिम आहे आणि आम्ही याबद्दल आभारी आहोत. आम्ही आणखी मजबूत होत आणि आमच्या सर्वोत्तम खेळासह परत येण्याचे ध्येय ठेवू. जय हिंद”
Together as one we set out to achieve our goal.Unfortunately we fell short and no one is more disappointed than us as a side.The support from all of you has been fantastic and we are grateful for it all.We will aim to come back stronger and put our best foot forward. Jai Hind???????????? pic.twitter.com/UMUQgInHrV
— Virat Kohli (@imVkohli) November 8, 2021
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या नामिबियाने २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने नामिबियाचे दिलेले लक्ष्य अवघ्या १५.२ षटकात आणि केवळ एक विकेटच्या नुकसानावर गाठले. परिणामी भारतीय संघाने ९ विकेट्स राखून विजय मिळवला.
गोलंदाजांमध्ये भारताच्या रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराहणे २ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी सामनावीर निवडले गेले.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात भारतीय संघाकडून निराशा, तब्बल ९ वर्षांनंतर ओढवली अशी नामुष्की
पाकिस्तान संघातील ३९ वर्षीय शोएब मलिक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करतो? घ्या जाणून
केवळ फलंदाजीतच नाही, तर क्षेत्ररक्षणातही चमकला हिटमॅन! ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय






