---Advertisement---

वर्कआऊटच्या दरम्यान विराट कोहलीने केला खतरनाक स्टंट, पहा व्हिडिओ

On: मंगळवार, जानेवारी 28, 2020 6:04 PM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहली(Virat Kohli) सर्वाधिक फिट असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. तो अनेकदा फिटनेसबद्दल बोलतही असतो. तसेच तो अनेकदा जिममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ, फोटोही पोस्ट करत असतो. असाच एक व्हिडिओ नुकताच विराटने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ विराट जिममध्ये वर्कआऊट करताना शूट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तो एक स्टंट करताना दिसून येत आहे. या व्हिडिओत दिसते की त्याने त्याच्या समोर एकावर एक ठेवलेल्या दोन बॉक्सच्यावर उडी मारली. या दोन बॉक्सची मिळून उंची साधारण 1 मीटरपेक्षा अधिक आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/B713u80lMec/

तसेच विराटच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. विशेष म्हणजे भारताचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही विराटच्या या व्हिडिओला ‘वाह!’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Screengrab: Instagram/ Virat Kohli

सध्या विराट भारतीय संघासह न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले 2 सामने भारतीय संघाने जिंकले असून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा टी20 सामना उद्या(29 जानेवारी) होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---