---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटूंनी अशा दिल्या होळीच्या शुभेच्छा…

---Advertisement---

आज देशभरात धुळवड साजरी होत आहे. जिथे पहावे तिथे रंगाची उधळण होताना दिसत आहे. प्रत्येक जण एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. मग यात क्रिकेटपटू तरी मागे कसे राहतील.

भारतीय क्रिकेटपटूंनीही आज चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, शिखर धवन, अजिंक्य रहाणे या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. तसेच त्यांनी सुरक्षित होळी खेळा असाही संदेश दिला आहे.

होळीच्या शुभेच्छा देताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की ‘सर्वांना होळीच्या शुभेच्छा, चला तेजस्वी रंग, सुंदर संबंध आणि आनंदी हस्य साजरे करु.’

तसेच सुरेश रैनाने म्हटले आहे की ‘आपल्या जीवनात आनंदाचे रंग भरो. तूम्हाला होळीच्या शुभेच्छा’

सध्या भारतीय क्रिकेटपटू शनिवारपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. आयपीएलमुळे परदेशातील क्रिकेटपटूही सध्या भारतात आले आहेत. त्यांनीही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच जगभरातील प्रसिद्ध फुटबॉल क्लब, आयपीएलचे संघ यांच्या सोशल मीडियावरही होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला बसला मोठा धक्का

यावर्षीच आयपीएल पहिल्यांदाच खेळणारे हे ५ प्रतिभावान खेळाडू

असे ५ खेळाडू ज्यांच वय ३७ पेक्षा जास्त आहे परंतु आयपीएलमध्ये करु शकतात धमाका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment