---Advertisement---

पदार्पण केलं पण फलंदाजी राहिली, तिसऱ्या टी२०त सूर्यकुमारसाठी बलिदान देणार का कोहली?

On: मंगळवार, मार्च 16, 2021 7:38 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे पार पडलेला दुसरा टी२० सामना भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याच्यासाठी खूप विशेष ठरला. या सामन्याद्वारे ३० वर्षीय सूर्यकुमारला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाची संधी मिळाली. दरम्यान आपल्या पदार्पणाच्या टी२० सामन्यात त्याने एक अप्रतिम झेल पकडत सर्वांना प्रभावित केले. मात्र त्याला हातखंडा असलेली फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. अशात १६ मार्च रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात त्याला फलंदाजी करायला मिळेल का नाही? याची चिंता सर्वांना सतावत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सूर्यकुमारला अष्टपैलू अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान दिले आहे. त्यामुळे त्याला मधल्या फळीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली आहे. त्याच्यापुर्वी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. अशात त्याला फलंदाजीसाठी पाठवण्यासाठी संघाच्या फलंदाजी फळीत काही बदल करावे लागतील. किंवा संघातील आघाडीच्या फलंदाजांची पटापट विकेट जावी लागेल.

सूर्यकुमारसाठी आपली जागा सोडले का विराट
याव्यतिरिक्त अजून एक पर्याय म्हणजे, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरणाऱ्या विराटला त्याचे स्थान सोडावे लागेल. भारतीय संघाकडून खेळण्यापुर्वी सूर्यकुमारने बरीच वर्षे आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. तो मुंबई संघाकडून सहसा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसतो. अशात इंग्लंडविरुद्धही त्याला याच क्रमांकावर संधी मिळाल्यास तो आपल्यातील प्रतिभा सर्वांपुढे सिद्ध करू शकेल.

ज्याप्रकारे पदार्पणवीर इशान किशनने सलामीला फलंदाजी करताना अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आणि सामनावीर ठरला. अगदी त्याचप्रमाणे सूर्यकुमारही आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याला अविस्मरणीय बनवण्याच्या दृष्टीने प्रदर्शन करू इच्छित असेल.

अशात कर्णधार विराट सूर्यकुमारसाठी संघाच्या रणनितीमध्ये काही बदल करेल का? सूर्यकुमारसाठी आपल्या स्थानाचे बलिदान देईल का? हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! भारत विरुद्ध इंग्लंडच्या उर्वरित टी२० सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश नाही, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्णय

दुसऱ्या टी२० सामन्यात खेळलेल्या ‘या’ तीन खेळाडूंना तिसऱ्या सामन्यात दाखवला जाणार बाहेरचा रस्ता?

जसप्रीत बुमराहची पत्नी संजनाचे पुणे कनेक्शन माहित आहे काय? पुण्यातील ‘या’ महाविद्यालयातून घेतलेय शिक्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---