भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतो. सध्या सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेत देखील विराटवर सर्वांचेच लक्ष्य आहे. विराट मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये मोठी खेळी करू शकला नाहीये, पण त्याने मैदानात असे काहीतरी केले, ज्यामुळे सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा कधी मैदानात पाय ठेवतो, तेव्हा त्याची खेळाप्रति असलेली उत्सुकता पाहण्यासारखी असो. भारतीय संघासाठी त्याने अनेक विक्रम केले आहेतच, पण आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) सोबत देखील त्याची कारकिर्दी जबरदस्त राहिली आहे. त्याने अनेक वर्षी आरसीबीच्या कर्णधाराची भूमिका देखील पार पाडली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटने असे काहीतरी केले, ज्यासाठी त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा दुसरा सामना भारताने 6 विकेट्सच्या अंतराने जिंकला. हा सामना सुरू होण्याआधी स्टेडियमध्ये उपस्थिती असलेल्या काही चाहत्यांनी विराटचे लक्ष वेधण्यासाठी आरसीबी-आरसीबी असे नारे दिले. ही गोष्ट विराटच्या लक्षात आल्यानंतर त्याला हे आपडले नाही, असेच दिसले. विराटने त्यावेळी भारतीय संघाची जर्सी घातली होती. त्याने चाहत्यांच्या ही नारेबाजी ऐकल्यानंतर जर्सीवरील भारतीय संघाच्या लोगोकडे हात दाखवत, चाहत्यांची ही नारेबाजी चुकीची असल्याचा इशाराच दिला. विराटने चाहत्यांना एकप्रकारे सांगितलेच की, तो याठिकाणी आरसीबीचे नाही, तर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. विराटचा हा इशारा पाहताच चाहत्यांचा गोंधळ पूर्णपणे बंद झाल्याचे दिसले. व्हिडिओत विराटसोबत वेगवान गोलंदाज हर्षल पटेल देखील दिसत आहे.
EXCLUSIVE: Virat’s reaction when the crowd chanted RCB..RCB in the second T20I at #Nagpur! #CricketWithYash #Kohli #INDvsAUS #NagpurT20I #KingKohli #cricket #CricketTwitter pic.twitter.com/JrcGrgHt1g
— Dr Yash Kashikar (@yash_kashikar) September 24, 2022
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियातील या टी-20 मालिकेचा विचार केला, तर पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्स विजय मिळलवाल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी, 25 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कॅप्टन रोहितची दहशत! केला ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम नावावर
भारताने सामना जिंकला असला तरी ‘या’ खेळाडूच्या नावावर नकोसा विक्रम; हार्दिक, चहलचाही समावेश
ज्युनियर तेंडुलकर झाला 23 वर्षांचा; जाणून घ्या बर्थ डे बॉयच्या आयुष्यातील मजेशीर किस्से