---Advertisement---

टी२० क्रमवारीत विराट कोहलीची झाली घसरण, जाणून घ्या अन्य खेळाडूंची क्रमवारी

On: मंगळवार, फेब्रुवारी 18, 2020 6:49 PM
---Advertisement---

काल (17 फेब्रुवारी) आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 10व्या क्रमांकावर घसरला आहे. मात्र, भारताचा युवा फलंदाज केएल राहुल आणि सलामीवीर फलंदाज रोहीत शर्मा अनुक्रमे दूसऱ्या आणि 11व्या स्थानावर कायम आहेत.

कोहलीला 673 गुणांसह एका स्थानाचे नुकसान झाले आहे. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत त्याने 4 डावात केवळ 105 धावाच केल्या होत्या.

रविवारी (16 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. ही मालिका इंग्लंडने 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेत 2 अर्धशतकांच्या मदतीने 136 धावा करणारा इंग्लंडचा कर्णधार इयान मोर्गन टी20 क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत एकूण 687 गुणांसह 9व्या स्थानावर पोहोचला आहे.

या यादीत पाकिस्तानचा बाबर आजम 879 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर, राहुल 823 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

याबरोबरच या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्विंटॉन डिकॉक 10व्या स्थानावरुन 16व्या स्थानावर घसरला आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज तेम्बा बावुमाने 127व्या स्थानावरून 52व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने 3 डावात 153.75 स्ट्राइक रेटने 123 धावा केल्या आहेत.

गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कोट्रेलसह संयुक्त 12व्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकीपटू तबरेज शम्सी 9 स्थानांची प्रगती करत पहिल्या 10मध्ये आला आहे. तो 8व्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशिद दक्षिण आफ्रिकेचा अँडिले फेहलुक्वायोला मागे टाकत 6व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टी20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात निर्णायक अंतिम षटक टाकून इंग्लंडला विजय मिळवून देणारा गोलंदाज टाम करन 28 स्थानांची प्रगती करत पहिल्या 30 गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे. याव्यतिरिक्त त्याने टी20 मालिकेत 5 विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा राशिद खान अव्वल क्रमांकावर आहे. तर अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत मोहम्मद नबी अव्वल क्रमांकावर आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1229749694940708864

https://twitter.com/Maha_Sports/status/1229734122895089666

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---