बेंगलोर । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काल भारतीय महिला क्रिकेट संघातील स्म्रिती मानधना आणि हरामनप्रीत कौर यांची भेट घेतली. काल झालेल्या सामन्यांनंतर ही भेट चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे झाली.
याचे फोटो बीसीसीआयच्या ट्विटर अकॉऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
#TeamIndia Captain @imVkohli meets @BCCIWomen members @ImHarmanpreet & @mandhana_smriti post the match in Bengaluru pic.twitter.com/3sMyl4ZfGD
— BCCI (@BCCI) September 29, 2017
स्म्रिती मानधना आणि हरामनप्रीत कौर ह्या भारतीय महिला संघाच्या सदस्य आहेत. यावर्षी इंग्लंड येथे झालेल्या महिला विश्वचषक संघात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला होता. या संघाच्या त्या सदस्य होत्या.
पुढील वर्षी फेब्रुवारीत भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा आहे. यात ३ सामने हे डबल हेडर होणार आहेत. यात भारतीय महिला संघ ३ वनडे तर ५ टी२० सामने खेळणार आहे. भारतीय पुरुष संघ या दौऱ्यात ३ कसोटी, ६ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे.