भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. तब्बल २ वर्ष उलटून गेले, तरीदेखील त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. त्याने २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. ज्यामुळे अनेकांनी त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी (Sa vs Ind 3rd test) झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अंतिम कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहली (Virat Kohli statement) म्हणाला की, “माझ्या फॉर्मबद्दल लोकांनी बोलण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. माझ्या कारकिर्दीत असे अनेकदा घडले आहे. जेव्हा २०१४ मध्ये मी इंग्लंड दौऱ्यावर गेलो होतो, त्यावेळी देखील असा प्रकार घडला होता. जग मला जसं पाहतं तसं मी स्वतःकडे कधीच पाहत नाही. मी फक्त संघासाठी माझे सर्वोत्तम काम करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि यापुढेही संघासाठी जे काही करता येईल ते करेन.”
हे नक्की पाहा :
तसेच दुसऱ्या कसोटी सामना सुरू असतानाच भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. तो पुढील सामन्यात खेळणार की नाही? याबाबत बोलताना विराट म्हणाला की, “तो अजूनही ठीक होत आहे. जो वेगवान गोलंदाज ११० टक्के फिट नाहीये, त्यामुळे जोखीम घ्यावी, असे मला वाटत नाही.”
तसेच भारतीय संघातील गोलंदाज सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. या गोलंदाजांबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला की, “सध्या आमच्याकडे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. आम्ही विचारात पडतो की, कुठल्या गोलंदाजाला संधी द्यावी आणि कोणाला बाहेर ठेवावे. खरं सांगायचं झालं, तर मला या गोष्टीचा खूप आनंद आहे.”
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील अंतिम आणि निर्णायक कसोटी सामना ११ जानेवारी पासून केपटाऊनच्या मैदानावर पार पडणार आहे. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे.
महत्वाच्या बातम्या :
विक्रमांची लागणार रास! केपटाऊन कसोटीत तब्बल सात खेळाडूंकडे पराक्रमांची सुवर्णसंधी