दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये नुकतीच ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाने ही मालिका १-२ ने गमावली. या सामन्यात डीआरएसचे (Dean Elgar DRS controversy) प्रकरण चांगलेच रंगले होते. आता सामना झाल्यानंतर विराट कोहलीने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी सुरू असताना डीआरएस प्रकरण घडले होते. ज्यामध्ये अश्विनच्या गोलंदाजीवर डीन एल्गरला बाद घोषित केले होते. परंतु, डीआरएस घेतला असता तो नाबाद दिसून आला होता. हे प्रकरण झाल्यानंतर भारतीय खेळाडू भलतेच संतापले होते. दरम्यान भारतीय खेळाडूंच्या वागणुकीवर अनेकांनी टीका देखील केली होती. मात्र, आता विराट कोहलीने याबाबत आपले मांडले आहे.
सामना झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli statement) म्हणाला की, “मला याबाबत काहीच बोलायचं नाहीये. आम्हाला माहीत आहे की, मैदानावर काय झालं आहे. परंतु मैदानात काय घडतंय हे बाहेरच्या लोकांना माहीत नसते. माझ्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर तिथे आम्ही ३ गडी बाद केले असते, तर तो सामना बदलून टाकणारा क्षण असू शकला असता. आम्ही त्यांच्यावर अतिरिक्त दबाव टाकण्यात अपयशी ठरलो. परिणामी आम्हाला हा सामना गमवावा लागला. ”
तसेच तो पुढे म्हणाला की, “तो क्षण वाद निर्माण करण्यासाठी पुरेसा असू शकला असता परंतु मला वाद निर्माण करण्यात काहीच एक रुची नाहीये. तो एक क्षण होता आणि आता आम्ही पुढे आलो आहोत . आमचे संपूर्ण लक्ष सामन्यावर होते. आम्ही गडी बाद करण्याच्या प्रयत्नात होतो.”
काय होते प्रकरण?
तर झाले असे की, आर अश्विनने टाकलेला चेंडू डीन एल्गरच्या पॅडला जाऊन लागला. त्यावेळी सर्व खेळाडूंनी पंचांकडे जोरदार अपील केले. पंच मराय इरॅस्मस यांनी देखील त्याला बाद घोषित केले होते. त्यावेळी डीन एल्गरने डीआरएसची मागणी केली होती. डीआरएस घेतला असता, चेंडू यष्टीच्या वरून जात असल्याचे दिसून आले. जे पाहून भारतीय खेळाडू भलतेच नाराज झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.
महत्वाच्या बातम्या :
खालीही पडला अन् क्लीन बोल्डही झाला! लॅब्युशेनची विकेट पाहून संघसहकाऱ्यांनाही आवरले नाही हसू
सर्वकालीन महान सलामीवीराने रिषभला दिली ‘स्टँडिंग ओव्हेशन’; शतकी खेळीबाबत म्हणाला…
हे नक्की पाहा: