ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे. या डावात ऑस्ट्रेलिया संघाकडून ४४ धावांची खेळी करणाऱ्या मार्नस लॅब्युशेन (Marnus Labhuchagne) आगळ्या वेगळ्या प्रकारे बाद झाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, ऑस्ट्रेलिया संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना २१ वे षटक टाकण्यासाठी स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजीला आला होता. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) गोलंदाजी करताना चेंडू टाकणार इतक्यात मार्नस लॅब्युशेन ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता. त्यावेळी शॉटसाठी बॅट स्विंग करताना स्पाइक्स घसरल्याने, तो खेळपट्टीवर पडला आणि ब्रॉडचा चेंडू मधल्या यष्टीला जाऊन लागला. लॅब्युशेन अशा पद्धतीने बाद झाल्याने, इंग्लंडच्या खेळाडूंसह ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथही ड्रेसिंग रूममध्ये हसताना दिसले. पण लॅबुशेन खूप निराश आणि हताश दिसून येत होता.
ऑस्ट्रेलिया संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मार्नस लाबुशेनने ५३ चेंडूंमध्ये ९ चौकरांच्या साहाय्याने ५३ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याला जीवनदान देखील मिळाले होते. इंग्लंडचा जॅक क्राॅलीने स्लीपमध्ये त्याचा झेल सोडला होता.
One of the weirdest dismissals we've ever seen! 😱#Ashes pic.twitter.com/8Qp5rKprn8
— cricket.com.au (@cricketcomau) January 14, 2022
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. संघाची धावसंख्या १२ असताना त्यांचे ३ फलंदाज माघारी परतले होते. ज्यामध्ये डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांचा समावेश होता. त्यानंतर मार्नस लॅब्युशेन आणि ट्रेविस हेड यांनी ७१ धावांची भागीदारी केली. गेल्या ५ डावात मार्नस लॅब्युशेनला एकही अर्धशतक झळकवता आले नाहीये. या डावात हेडने शतकी खेळी केली आहे.
तसेच या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेत ३-० फरकाने विजयी आघाडी घेतली आहे. सलग ३ सामने जिंकल्यानंतर चौथा सामना अनिर्णीत राहिला होता.
महत्वाच्या बातम्या :
विराटची ‘कासवगती’! कर्णधार म्हणून नकोसा विक्रम केला नावावर
आयपीएलमध्ये नाही दिसणार इंग्लिश खेळाडू?
हे नक्की पाहा: