---Advertisement---

‘…तू नव्या पिढीचा नेता’; पाकिस्तानी मित्राने विराटच्या राजीनाम्यानंतर केली भावनिक पोस्ट

On: रविवार, जानेवारी 16, 2022 7:41 PM
kohli-sa
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक विराट कोहली (Virat Kohli) याने शनिवारी (१५ जानेवारी) भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाच्या एका खेळाडूच्या रूपात दिसेल. कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्यापूर्वी त्याने टी२० संघाचे कर्णधारपद देखील सोडले होते. तर एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेतले गेले होते. विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांना आणि युवा खेळाडूंनी त्याला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद आमिर (Mohammad Amir) यानेही विराटसाठी खास पोस्ट केली आहे.

पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने विराटच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने विराटला सर्वात मोठे नेतृत्व ठरवले आहे. आमिरने केलेल्या ट्वीटर पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझ्यासाठी तूच नव्या पिढीचा खरा नेता आहे. कारण तू युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देतो. मैदानावर आणि मैदानाबाहेर तू असेच रॉक करत राहा.” आमिरव्यतिरिक्त इतर अनेक खेळाडूंनी विराटच्या या निर्णयानंतर आश्चर्य व्यक्त करत, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विराट कोहलीची कसोटी कारकीर्द

विराटच्या कसोटी कारकिर्दीचा विचार केला, तर तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि त्यापैकी ४० मध्ये विजय मिळवले. जागतिक क्रिकेटमध्ये दक्षिण अफ्रिकाचा ग्रॅमी स्मिथ, तसेच ऑस्ट्रेलिचा रिकी पॉंटिंग आणि स्टीव वॉ हे तिघे विराटपेक्षा यशस्वी कर्णधार आहेत. विराटच्या सात वर्षाच्या कसोटी कर्णधाराच्या कार्यकाळात भारताने अनेक मालिका जिंकल्या. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये संघाने पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकल्या.

कसोटी कर्णधारपद सोडताना विराटने मानले सहकाऱ्यांचे आभार

दरम्यान, विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. या पोस्टमध्ये त्याने बीसीसीआयचे आभार मानले. तसेच माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींसह सपोर्ट स्टाफकडून त्याला नेहमी साथ मिळाल्याचे सांगितले. त्याव्यतिरिक्त शेवटी त्याने एमएस धोनी आभार मानले. धोनीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि संघाच्या कर्णधारपदासाठी त्याला पात्र समजण्यासाठी धन्यवाद म्हटले.

महत्वाच्या बातम्या –

धोनीच्या तोंडून निघालेले बोल उतरले सत्यात, विराटच्या राजीनाम्यानंतर खरी ठरली ‘ती’ भविष्यवाणी

विराटनंतर रोहितला कसोटीचा संघनायक बनवण्याच्या तयारीत नाही बीसीसीआय? ‘या’ नावांवर आहे नजर

‘त्या’ एका ट्वीटमुळे बदललं सर्वकाही, विराटनंतर आता भारतीय क्रिकेटमध्ये सुरू होणार रोहितपर्व!

व्हिडिओ पाहा –

बेधडकपणे खेळणाऱ्या पंतबद्दल या गोष्टी नक्कीच माहित नसतील| Rishabh Pant Facts

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---