---Advertisement---

जो रूटपुढे भारताची गोलंदाजी खिळखिळी, कर्णधार कोहलीच्या ‘त्या’ निर्णयाचे भारताला भोगावे लागणार फळ?

On: रविवार, ऑगस्ट 15, 2021 1:14 PM
Virat-Kohli-Ravi-Shastri
---Advertisement---

लॉर्ड्स येथे इंग्लंड विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय सलामीवीर केएल राहुलच्या १२९ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३६४ धावा फलकावर नोंदवल्या होत्या. सलामीवीर रोहित शर्मा (८३ धावा) आणि कर्णधार विराट कोहली (४२ धावा) यांनीही यात हातभार लावला होता. भारतीय फलंदाजांच्या कामगिरीनंतर इंग्लंडला कमी धावांवर रोखण्याची जबाबदारी गोलंदाजांवर होती. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत संघाला पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली. यानंतर कर्णधार कोहलीच्या एका निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

उभय संघातील पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार कोहली ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानावर उतरला होता. फिरकीपटू गोलंदाजीसाठी त्याने अनुभवी आर अश्विनला न घेता रविंद्र जडेजाची निवड केली होती. अशात दुसऱ्या सामन्यात तरी अश्विनला जागा दिली जाईल अशी क्रिकेट जाणकारांना अपेक्षा होती. पण कोहलीने या सामन्यातही त्याला खेळवले नाही.

कदाचित त्याचेच परिमाण लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाले आहेत. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मामुळे इंग्लंडचा संघ पहिल्या डावात नाममात्र २७ धावांची आघाडी घेऊ शकला. सिराजने भारताकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर इशांतने ३ विकेट्सचे योगदान दिले. मोहम्मद शमीनेही २ विकेट्स काढत संघावरचा दबाव कमी केला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वांनाच निराश केले. त्याच्याप्रमाणे एकमेव फिरकीपटू जडेजाही खास प्रदर्शन करू शकला नाही. त्याने पूर्ण डावादरम्यान एकही विकेट घेतली नाही.

मात्र हे पाचही गोलंदाज इंग्लंडच्या कर्णधार रूटला बाद करू शकले नाहीत. त्याने एकट्याने शेवटपर्यंत नाबाद १८० धावा चोपत संघाला आघाडी मिळवून दिली.

३४ वर्षीय अश्विनच्या खात्यात ४१३ विकेट्सची नोंद आहे. परदेशी मैदानांवर गोलंदाजी करण्याचा बराचसा अनुभवही त्याला आहे. भारताला मागील ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. अशात या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांपुढे भक्कम भिंतीप्रमाणे उभा राहिलेल्या रूटची विकेट मिळवून देण्यात अश्विनचा अनुभव कामी आला असता. अश्विनने आतापर्यंत कसोटीत रूटला ५ वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे.

म्हणून लॉर्ड्स कसोटी सामन्यात कोहलीचा अश्विनला न खेळवण्याचा निर्णय भारतीय संघाला महागात पडेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

चक्क ‘बिग बी’ अमिताभ बच्चनने लावली लॉर्ड्स कसोटीत हजेरी, हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल असचं

आले आले!! क्वारंटाईन संपवून पृथ्वी अन् सूर्यकुमार भारताच्या ताफ्यात सहभागी, खेळणार तिसरी कसोटी?

दुबईच्या आलिशान हॉटेलमध्ये थांबलाय सीएसके संघ, एका दिवसाचे भाडे ऐकून उडेल तुमची झोप!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---