लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी जो रूटने अप्रतिम फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर टाकले होते. त्यानंतर मोहम्मद सिराज आणि ईशांत शर्मा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला पुन्हा एकदा सामन्यात आणले होते. दरम्यान विराट कोहलीने एक अप्रतिम झेल टिपला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट) जो रूटच्या शतकी खेळीमुळे इंग्लंड संघ मजबूत स्थितीत होता. परंतु टी ब्रेकनंतर ईशांत शर्माने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने २ गडी बाद करत भारतीय संघाला पुनरागमन करून दिले होते. यादरम्यान त्याने मोईन अलीला देखील बाद करत माघारी धाडले होते.
तर झाले असे की, इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना ११० वे षटक टाकण्यासाठी ईशांत शर्मा गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचवा चेंडू ईशांत शर्माने ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकला होता. जो बॅटचा कड घेत स्लीपमध्ये असलेल्या विराट कोहलीच्या हातात गेला. परंतु हा झेल टिपणे इतके सोपे नव्हते. कारण तो झेल विराट कोहलीच्या पुढे पडला होता. विराटने जर चपळता दाखवली नसती तर, तो चेंडू जमिनीला स्पर्श झाला असता. विराटने टिपलेला हा झेल पाहून आपण अंदाज घेऊ शकतो की, तो आपल्या फिटनेसवर किती मेहनत घेतो.(Virat Kohli taken unbelievable catch of Moeen Ali)
✌️ in ✌️#IshantSharma is on 🔥! Double blow 🤜 for #England!
Come on #TeamIndia 👏👏👏👏👏#ENGvIND #ENGvsIND #INDvENG #INDvsENG #Cricketpic.twitter.com/xzGHVxKMFR— BlueCap 🇮🇳 (@IndianzCricket) August 14, 2021
मोईन अलीला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर ईशांत शर्माने सॅम करनला बाद करत माघारी धाडले होते. सॅम करन बाद झाल्यानंतर इंग्लंड संघ पूर्णपणे बॅकफूटवर आला होता. यापूर्वी त्याने जोस बटलरला ही देखील त्रिफळाचीत करत माघारी धाडले होते. परंतु, कर्णधार जो रूटने एकहाती झुंज देत इंग्लंड संघाला ३९१ धावांपर्यंत पोहचवले होते. यासह २७ धावांची आघाडी देखील घेतल होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन ते युवराज, भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंनी ‘अशा’ दिल्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा
बरोबर एक वर्षापूर्वी धोनीने ‘तो’ मोठा निर्णय घेतला अन् करोडो क्रिकेटप्रेमींचे हृदय तुटले