पुणे। मंगळवारी (२६ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ३९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात बेंगलोरला २९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातही बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट शांत राहिली. पण असे असले तरी, त्याने क्षेत्ररक्षण करताना एक कमालीचा झेल घेतला, ज्याचे कौतुक होत आहे.
विराटचा शानदार झेल
मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore vs Rajasthan Royals) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी केली. पण, राजस्थानची वरची आणि मधली फळी स्वस्तात बाद करण्यात बेंगलोरच्या गोलंदाजांनी यश मिळवले. त्यातच १८ व्या षटकात विराटने (Virat Kohli) राजस्थान रॉयल्सकडून ८ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ट्रेंट बोल्टचा (Trent Boult) शानदार झेल घेतला.
Damn Virat Kohli💪
full marks for this catch💯#ViratKohli𓃵 | #RRvRCB | #IPL2022 pic.twitter.com/gQReHleVb6— Harshit (@ahhshitharshit) April 26, 2022
बेंगलोरकडून १८ वे षटक हर्षल पटेलने टाकले होते. या षटकाचा पहिला चेंडू बोल्टने शॉर्ट मिड-विकेटच्या दिशेने खेळला. पण, तेव्हा विराटने चपळाई दाखवली आणि डाव्या बाजूला उडी मारत अफलातून झेल घेतला. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्याच्या या झेलमुळे बोल्ट ५ धावांवर बाद झाला.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
फलंदाजीत विराट अपयशी
विराट आयपीएलच्या १५ व्या हंगामात फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसत आहे. त्याने या आयपीएल हंगामात आत्तापर्यंत ९ सामन्यांत १६ च्या सरासरीने १२८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही. त्याची ४८ ही या हंगामातील आत्तापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.
बेंगलोरचा राजस्थानकडून पराभव
राजस्थानने मंगळवारी झालेल्या सामन्यात २० षटकांत ८ बाद १४४ धावा केल्या आणि बेंगलोरसमोर १४५ धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थानकडून रियान परागने नाबाद ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा डाव १९.३ षटकांत ११५ धावांवरच संपुष्टात आला. बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या. अन्य कोणाला २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.
गोलंदाजीत बेंगलोरकडून मोहम्मद सिराज, वनिंदू हसरंगा आणि जोस हेजलवूड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच हर्षल पटेलने १ विकेट घेतली. राजस्थानकडून कुलदीप सेनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘तीन-चार फ्रँचायझी खोटे बोलल्या, त्यांनी धोका दिला’, हर्षल पटेलचा मोठा खुलासा
रियान परागचा फलंदाजीतच नाही, तर फिल्डिंगमध्येही जलवा; कॅलिस, गिलख्रिस्टच्या पंक्तीत स्थान
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा बाद होणारा बेंगलोर दुसरा संघ, पहिल्या क्रमांकावर ‘या’ संघाचे नाव