fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जेव्हा एकही चेंडू न टाकता विराटने घेतली होती केविन पिटरसनची विकेट…

काल(2 एप्रिल) इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसन आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ चॅट केले होते. या दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. या गप्पांदरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पिटरसनची विकेट घेतल्याचीही आठवण करुन दिली.

तसेच विराटने पिटरसनची ही विकेट वाईड बॉलवर घेतली असल्याचेही सांगितले. या विकेटबद्दल बोलताना विराट पिटरसनला म्हणाला, ‘मी एकमेव गोलंदाज आहे ज्याने अधिकृत चेंडू न टाकता म्हणजे झिरो बॉलवर एक विकेट घेतली आहे. तू बाद झाल्यावर त्यावेळी माझ्याकडे पाहिले पण नव्हते.’

नक्की काय झाले होते त्या सामन्यात?

भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे 31 ऑगस्ट 2011 ला एकमेव टी20 सामना खेळत होता. या सामन्यात रहाणेने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 165 धावा केल्या होत्या आणि इंग्लंड समोर विजयासाठी 166 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 78 चेंडूत 110 धावांची गरज असताना पीटरसन आणि इयान मॉर्गन फलंदाजी करत होते. यावेळी भारताचा त्यावेळीचा कर्णधार एमएस धोनीने विराटकडे चेंडू सोपवला.

विराटने त्याच्या कारकिर्दीतील हा पहिलाच चेंडू वाईड टाकला. पण यष्टीमागे चपळ असणाऱ्या धोनीने विराटने लेग साइडला टाकलेला हा चेंडू पकडत पीटरसनला यष्टीचीत केले. त्यामुळे विराटला त्याची पहिली विकेटही मिळाली.

क्रिकेटमध्ये वाइड चेंडूवर फलंदाजाला बाद दोन प्रकारे करता येते, एक म्हणजे यष्टीचीत आणि दुसरा पर्याय म्हणजे हिट विकेट.

त्यावेळी विराटने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये गोलंदाजीतील कारकिर्द वाईड चेंडूवर विकेट घेत सुरु केली. त्या चेंडूनंतर त्याच्या नावापुढे त्याचे गोलंदाजी आकडे 0.0-0-0-1 असे दिसत होते. या चेंडूनंतर विराटने त्या षटकात तीन धावा दिल्या.

या सामन्यात इंग्लंडने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

ट्रेंडिंग घडामोडी – 

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक शतके करणारे ५ भारतीय शिलेदार, धोनीच्या नावावर आहेत…

म्हणून षटकार किंग युवराज दादाची कीट बॅग आवरायचा!

युवराजचे ५ असे विक्रम जे धोनी कधीही मोडू शकत नाही

You might also like