विश्वचषक 2023 साली सचिन तेंडुलकरने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर जबरदस्त षटकार ठोकला होता. आता विराट कोहलीने दिग्गज तेंडुलकरच्या त्या षटकारावर प्रतिक्रिया दिली आहे. 2003 च्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तो सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला होता. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना सचिनने भारतासाठी सामनाविजयी खेळी खेळली होती.
सचिन तेंडुलकर (Sachin Teandulkar) ने फलंदाजी करताना आपल्या डावात फक्त एकच षटकार मारला होता आणि तो षटकार शोएब अख्तरवर ठोकला होता. तर आता त्या षटकारावर विराट कोहली (Virat kohli) म्हणाला की, “सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरवर तो षटकार मारला तेव्हा मी उत्साहात उड्या मारत होतो.” ऑफ साइडच्या दिशेने कट करत असताना सचिनने अख्तरला षटकार ठोकला. अख्तरने तो चेंडू150 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने टाकला होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकात 7 गडी गमावून 273 धावा केल्या होत्या. संघाकडून सलामीला आलेल्या सईद अन्वरने 126 चेंडूत 7 चौकार लगावत 101 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 45.4 षटकांत 4 विकेट्स राखून लक्ष्य गाठले. संघासाठी सलामीला आलेल्या सचिन तेंडुलकरने 75 चेंडूत 130.67 च्या स्ट्राईक रेटने 98 धावांची खेळी केली.
तेंडुलकरच्या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. तो सामना जिंकवल्यानंतर त्याला सामनावीर चा पुरस्कार देण्यात आला. तेंडुलकरशिवाय युवराज सिंगने भारताकडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 50 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार मारले. त्याचवेळी राहुल द्रविड 76 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा करून परतला.
Virat Kohli said, "I was jumping in joy when Sachin Tendulkar hit that six against Shoaib Akhtar". pic.twitter.com/JVy7t2qSQL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 31, 2023
आशिया चषकात भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ 2 ऑक्टोंबरला आमने-सामने असणार आहेत. भारत आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यासाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. तर पाकिस्तान संघाने आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे. नेपाळविरुद्ध खेळताना पाकिस्तान संघाने 238 धावांनी विजय प्राप्त केला. (virat kohli talk about sachin tendulkar hit the six agianst shoaib akhtar in world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
‘हो’ म्हणली रे! मिलरने किस करत गर्लफ्रेंडला केले Propose, शुबमन-हार्दिकच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष
कसे सुरू झाले ‘नागिन डान्सचे’ युद्ध, बांगलादेश आणि श्रीलंकेचा मजेदार किस्सा