नुकताच आयपीेल २०२२चा पहिला एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात बेंगलोरने लखनऊच्या संघाला पराभूत केले. बंगलोरसाठी या सामन्यात हुकमी एक्का ठरला तो रजत पाटीदार. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी सामना जिंकणारे शतक झळकावले. मॅचनंतर रजत आणि विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. खरं तर, विराट कोहली रजतची मुलाखत घेत होता. या मुलाखतीवेळी विराटने रजतसोबत मजामस्ती केली. यावेळी विराट रजतच्या आडनावाचा उल्लेख चुकीचा करताना दिसला. लगेचच रजतने त्याचे आडनाव सुधारले.
या व्हिडिओमध्ये माजी कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की, “आता विरोधी संघांनी या फलंदाजाला हलक्यात घेऊ नये. सामन्याचा निकाल इतका मोठा होता की, मी तणावात होतो. कारण, मी अशा परिस्थितीत होतो जेव्हा तुम्हाला एक संघ म्हणून जिंकावे लागेल. पाटीदारने जे केले ते खूप खास होते, त्याला कोणी हलक्यात घ्यावे, असे मला वाटत नाही. या खेळीची उत्कृष्टता तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि एक क्रिकेटर म्हणून अशा खेळी पाहण्यासाठी त्याचे कौतुक केले पाहिजे.”
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
विराट पुढे म्हणाला की, “मी सामन्यानंतरही त्याला सांगितले होते की, मी इतक्या वर्षांत अनेक प्रभावी खेळी आणि दबावाखाली अनेक डाव पाहिले आहेत, पण त्याच्यासारखी चांगली फलंदाजी मी याआधी कधीच पाहिली नाही.” मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर रजतने मे महिन्यात लग्न करण्याचा विचार केला होता. स्पर्धेदरम्यान देशात क्रिकेटचा कोणताही मोठा कार्यक्रम होत नसल्यामुळे, क्रिकेटपटूच्या कुटुंबीयांची इच्छा होती की, त्याने खेळातून ब्रेक घेऊन लग्न करावे.
💬 💬 "Haven't seen many better innings than the one Rajat played."
DO NOT MISS: @imVkohli chats with the man of the moment, Rajat Patidar, after @RCBTweets' win over #LSG in Eliminator. 👏 👏 – By @RajalArora
Full interview 📹 🔽 #TATAIPL | #LSGvRCBhttps://t.co/ofEtg6I3Ud pic.twitter.com/TG8weOuZUo
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2022
एका रिपोर्टनुसार, रजतचे वडील मनोहर पाटीदार म्हणाले की, “आम्ही त्याच्यासाठी रतलाममधील एक मुलगी पाहिली आहे. ९ मे रोजी त्यांचे लग्न होणार होते. एक छोटेसे फंक्शन होणार होते आणि त्यासाठी मी इंदोरमध्ये हॉटेलही बुक केले होते. मात्र, आता त्यांचा लग्न सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.”
रजत पाटीदार याने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ५४ चेंडूत नाबाद ११२ धावा चोपल्या. यामध्ये त्याने ७ षटकार आणि १२ चौकारांची बरसात केली.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मला बघणं बंद कर आणि बॉल टाक; जेव्हा धोनीला पहिल्यांदा भेटला होता ‘हा’ भारतीय गोलंदाज, वाचा किस्सा
धक्कादायक! वृद्धिमान साहाने अर्ध्यातच सोडली संघाची साथ, व्हॉट्सऍप ग्रूपमधूनही गायब
हमारी छोरियां छोरो से कम है के? राधा यादवचा झेल बघून तुम्ही पण व्हाल दंग