---Advertisement---

कुलदीपला वगळून वॉशिंग्टनला संधी का दिली? टीम इंडियाचा कर्णधार कोहलीने सांगितले कारण

On: गुरूवार, फेब्रुवारी 25, 2021 9:22 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु इंग्लंड संघाचा हा निर्णय फसला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंड संघाला अवघ्या ११२ धावांवर ऑल आऊट केले आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात २ बदल करण्यात आले आहेत.

यात मोहम्मद सिराज ऐवजी जसप्रीत बुमराहला संघात समाविष्ट केले आहे. तसेच दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज कुलदीपला तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर काढण्यात आले आहे. त्याच्याजागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला स्थान देण्यात आले आहे. कर्णधार विराट कोहलीने यामागील कारण सांगितले आहे.

या निर्णयाबाबत कोहली म्हणाला की, “पिंक बॉल कसोटी सामन्यासाठी आम्हाला अतिरिक्त फलंदाज आणि फिरकी गोलंदाजाची गरज होती. सुंदर या दोन्ही गोष्टी करू शकतो. यामुळे त्याला संधी देण्यात आली आहे. तसेच कुलदीपला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी दिली गेली होती. परंतु त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.”

कुलदीप यादवची कामगिरी

डाव्या हाताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचे २०१९ पासूनच संघात आत बाहेर होण्याचे सत्र सुरू आहे. तो भारतीय संघात असतो पण पहिल्या ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी त्याला मिळत नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी दिल्यानंतर त्याने फक्त २ बळी मिळवले होते. त्याने आतापर्यंत भारताकडून एकूण ७ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात २६ गडी बाद केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माचा झंझावात! अर्धशतक करत घडवला इतिहास; ‘हा’ हिट विक्रम करणारा जगातील तिसरा क्रिकेटपटू

‘नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी रंग बदलणार नाही, कारण…’ मास्टर ब्लास्टरचे महत्त्वपुर्ण वक्तव्य

अवघ्या २७ धावा, तरीही विराटची मोठ्या विक्रमाला गवसणी! ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय आणि जगातील पाचवा दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---