भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन वनडे सामन्यांसाठी तसेच टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या दोन वनडे सामन्यात आणि टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व उपकर्णधार रोहित शर्मा करेल.
याबद्दल बीसीसीआयने म्हटले आहे की ‘त्याचा मागील काही महिन्यांचा ताण लक्षात घेता संघ व्यवस्थापन आणि वरिष्ठ निवड समीतीने त्याला मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेआधी पुरेशी विश्रांती देण्याचा विचार केला आहे.’
‘या न्यूझीलंड दौऱ्यात कोहलीचा बदली खेळाडू म्हणून कोणत्याही खेळाडूची निवड केली जाणार नाही. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारताचे नेतृत्व जबाबदारी स्विकारेल.’
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध फेब्रुवारीमध्ये 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेत हा प्रतिभावान खेळाडू १०० टक्के करणार पदार्पण
–केवळ ३६ वनडे खेळलेल्या कुलदीप यादवने जगाला या गोष्टीमुळे दखल घ्यायला लावली
–ज्या देशात पाऊल ठेवतो त्या देशात हा भारतीय खेळाडू नादबाद खेळी करतो