---Advertisement---

कर्णधार विराट कोहलीही अपवाद नाही, ही गोष्ट करावीच लागणार

---Advertisement---

एशिया कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान कसोटी मालिका होणार आहे. 4 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली परतणार आहे.

नवभारत टाईम्सच्या अहवालानुसार विश्रांतीनंतर विराट कोहली यो-यो टेस्टला सामोरा जाणार आहे. त्याची यो-यो टेस्ट 28 सप्टेंबरनंतर होणार असल्याची माहीती  देण्यात आली आहे.

बीसीसीआयने ही चाचणी संघात निवड होण्यासाठी बंधनकारक करण्यात आली आहे. भारतीय  संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या म्हणन्यानुसार ही चाचणी खूप महत्वाचा असून खेळाडू फिट असल्याची पावती आहे.

खेळांडूसाठी कमीत कमी 16.1 इतके गुण मिळवणे आवश्यक आहे. ह्या चाचणीत अपयशी ठरल्यामुळे अंबाती रायडूला  इंग्लड दौऱ्यातून वगळण्यात आले होते. रायडू ह्या चाचणीतील कमीत कमी गुणसंख्या  मिळवण्यात अपयशी ठरला होता.

विराट बरोबर ईशांत शर्मा आणि आर आश्विन या दोघांची यो-यो चाचणी 29 सप्टेंबर होणार आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धची मालिका लक्षात घेता आश्विनला या मालिकेत विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना 4 ऑक्टोबरपासून राजकोट येथे सूरू होणार आहे. तर दुसरा सामना 12 ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सूरू होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

केएल राहुल म्हणाला, मी ती गोष्ट करायला नको होती…

भारत-अफगाणिस्तान सामना टाय झाल्यानंतर रडणाऱ्या चिमुकल्या चाहत्याला भुवनेश्वर कुमारला दिली खास भेट

टॉप ५: भारत-अफगाणिस्तानच्या सामन्यात झाले हे खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment