---Advertisement---

कर्णधार विराटने सांगितले सनरायझर्सविरुद्धच्या पराभवाचे कारण; म्हणाला, “शेवटी डीविलियर्सने….”

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 12:05 PM
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा हा तिसरा संघ आहे. मात्र बुधवारी (६ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ४ गडी राखून पराभूत केले. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ विजय मिळवू शकला असता, कारण एबी डिविलियर्ससारखा फलंदाज शेवटच्या क्षणी खेळपट्टीवर उपस्थित होता. तरीदेखील या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पराभवाचे खरे कारण काय? याचा खुलासा केला.

सामना झाल्यानंतर विराटने म्हटले की, “एबीने स्ट्राइकवर राहायला हवे होते. जेव्हा तो खेळपट्टीवर असतो त्यावेळी आम्ही सामन्यात असतो. आम्हाला खात्री करावी लागेल की, जो खेळाडू चांगली कामगिरी करतोय तो खेळाडू स्ट्राइकवर यायला हवा. ही खेळपट्टी धावांचा पाठलाग करताना इतकी प्रभावी नव्हती. शाहबाजने चांगली खेळी केली परंतु आम्ही कुठेतरी कमी पडलो. सनरायझर्सने शेवटच्या काही षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. ज्यामुळे हा सामना आमच्यापासून दूर गेला. असे वाटत होते की, त्यांनी आपल्या सर्वोत्तम कामगिरीसह पुनरागमन केले आहे.”

तसेच या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून १५३ गतीचा चेंडू टाकणाऱ्या उमरान मलिकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. विराटने देखील त्याचे तोंडभरून कौतुक केले. उमरान मलिकबाबत बोलताना विराट म्हणाला, “आमची अशी इच्छा आहे की त्याने चांगली कामगिरी करावी. या स्पर्धेतून दरवर्षी नवीन प्रतिभावान खेळाडू बाहेर येत असतात. एखाद्या खेळाडूला १५० पेक्षा अधिक गतीने गोलंदाजी करताना पाहून बरे वाटले. पुढे जाणाऱ्या व्यक्तीच्या प्रगतीची दखल घेणे तितकेच आवश्यक आहे.”

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, जेसन रॉयने ४४ धावांची खेळी केली तर केन विलीयमसनने ३१ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटक अखेर १४१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना देवदत्त पडीक्कलने ४१ तर ग्लेन मॅक्सवेलने ४० धावांचे योगदान दिले. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या-

अंतिम षटकात मॅच विनिंग गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वरचा डिविलियर्सविरुद्ध होता ‘हा’ प्लॅन, वाचा

मॅक्सवेलची यंदाचा ‘सिक्सर किंग’ बनण्याच्या दिशेने कूच, हैदराबादविरुद्ध २ षटकार ठोकत दुसऱ्या स्थानी उडी

चूकीला माफी नाही! कोहलीच्या लाडक्या सिराजने सोडला सोपा झेल, कर्णधाराने मैदानातच ऐकवलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---