आयपीएल २०२२चा तेरावा सामना मंगळवारी (०५ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ३ विकेट्सच्या नुकसानावर १६९ धावा जोडल्या. यादरम्यान बेंगलोरचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याने राजस्थानच्या देवदत्त पडीक्कल याचा जबरदस्त झेल टिपला. मात्र पंचांनी त्याच्या झेलवर शंका उपस्थित केली आणि मैदानात नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला.
त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला दुसऱ्याच षटकात यशस्वी जयस्वालरूपी पहिला धक्का बसला. त्यानंतर देवदत्त पडीक्कल आणि सलामीवीर जोस बटलर यांनी डाव सावरला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी झाली. मात्र २९ चेंडूंमध्ये ३७ धावा करून पडीक्कल हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.
पडीक्कलने हर्षलच्या धीम्या चेंडूवर मोठा खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू हवेमध्ये उंच केला आणि विराटने मागच्या दिशेने धावत त्याचा अचूक आणि अद्भुत झेल घेतला. मात्र या झेलनंतर मैदानात मोठा गोंधळ उडाल्याचे दिसले.
What a catch by king kohli👑🔥 pic.twitter.com/TFOp7zCgEP
— Sumant Viratian (@ViratianSumant) April 5, 2022
https://twitter.com/ViratKo52121224/status/1511374241354366978?s=20&t=erm6XOT-Z-EZvT9EUOYITg
https://twitter.com/IamKritika__/status/1511374296068763649?s=20&t=HmBqhv3JJ_VmS9Jbtsb1CQ
बाद झाल्यानंतर पडीक्कल मैदानाबाहेर जात होता आणि कर्णधार संजू सॅमसन फलंदाजीसाठी मैदानावर येत होता. इतक्यात तिसऱ्या पंचांनी हा झेल पुन्हा तपासण्याचे ठरवले. पडिक्कल डगआऊटमध्ये पोहोचला होता. मात्र त्याला चौथ्या पंचांना थांबण्यास सांगितले आणि मैदानी पंचांनी सॅमसनला खेळपट्टीवर जाण्यापासून अडवले. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी रिप्लेमध्ये विराटचा झेल तपासला आणि त्याचा झेल अचूक असल्याचे सांगितले. परिणामी पडीक्कल पव्हेलियनला परतला आणि संजू मैदानावर उतरला.
Virat Kohli be like: Fixing aur cheating se dur dur tk koi naata nhi rkhta hu bhai😂😂😂
Haven't seen him claiming a catch that he himself isn't sure of.♥️ https://t.co/qFDQCppM8M— Priyank Sahai (@priyank_sahai) April 5, 2022
मात्र पंचांकडून झालेल्या या संपूर्ण नाट्यमय प्रसंगावर विराट भडकल्याचे दिसला. तो पंचांना जाऊन त्यांच्या या कृतीमागचे कारणही विचारताना दिसला.
विराट पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप
भलेही विराटने या सामन्यादरम्यान शानदार झेल टिपला असला तरीही तो पुन्हा एकदा फलंदाजीत निराशाजनक कामगिरी करून स्वस्तात बाद झाला. फाफ डू प्लेसिस आणि अनुज रावतची सेट जोडी परतल्यानंतर विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. परंतु तो केवळ ५ धावांवर दुर्देवीरित्या धावबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022 | जोस बटलरचे RCBविरुद्ध ‘६ चेंडू आणि ६ षटकार’, विक्रमाच्या मोठ्या यादीत नोंदवलं नाव
हसरंगापुढे सॅमसन नेहमीच टेकतो गुडघे, यंदाही दुर्देवीरित्या झेलबाद होत नकोशा विक्रमात बनला अव्वल
जोस इज द बॉस! पुन्हा बनला ‘शतकवीर’, पण यावेळी धावांची नव्हे तर षटकारांची सेंच्यूरी; वाचा सविस्तर