भारत विरुद्ध इंग्लंड या संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ चांगली कामगिरी करून विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. परंतु सामन्याच्या सुरुवातीलाच विराट कोहली पुन्हा एकदा कमनशिबी ठरला आहे.
मालिकेतील दुसरी लढत ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून पाहुण्या भारतीय संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले आहे. अशाप्रकारे विराट कोहली पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत दुर्दैवी ठरला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण ८ कसोटी सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने नाणेफेक गमावली आहे. २०१८ मध्ये झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने नाणेफेक गमावली होते. त्यानंतर न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आणि नुकत्याच सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावली आहे. अशाप्रकारे नाणेफेक न जिंकता सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा नकोसा विक्रम कोहलीच्या नावे झाला आहे.
Virat Kohli is the only captain to have played 8 or more Tests in a country without winning a single Toss.#ENGvIND
— ComeOn Cricket ???????????? (@ComeOnCricket) August 12, 2021
विराट कोहली हा एकमेव कर्णधार आहे, ज्याने एका संघाविरुद्ध ८ पेक्षा अधिक सामने खेळले आहेत आणि प्रत्येक सामन्यात तो नाणेफेक जिंकण्यात अपयशी ठरला आहे. तसेच कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड संघाविरुद्ध एकूण १६ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये १४ वेळेस इंग्लंड संघाला नाणेफेक जिंकण्यात यश आले आहे. तर २ वेळेस भारतीय संघाने नाणेफेक जिंकले आहे.(Virat Kohli toss record in England)
Virat Kohli toss record vs England in Tests
Mat 16
Toss won 2
Toss lost 14In eight Tests he led India in England, he has lost toss all eight times. (including WTC final)#ENGvIND
— Deepu Narayanan (@deeputalks) August 12, 2021
भारताची प्लेइंग इलेव्हन (११ खेळाडू) : केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन (११ खेळाडू) : रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, हसीब हमीद, जो रुट, जोनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम करन, ओली रॉबिन्सन, मार्क वूड आणि जेम्स अँडरसन






