आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. स्पर्धेतील पिहले दोन्ही सामने जिंकून भारताने सुपर फोरमध्ये स्थआन पक्के केले. आता रविवारी (4 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली देखील फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे. त्याने पाकिस्तनविरुद्धच्या या सामन्यापूर्वी खास सराव केला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकानंतर भारताच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. रोहितच्या नेतृत्वात खेळताना त्याचा फॉर्म सुधारेल अशी अपेक्षा सर्वांना होती, पण तसे झाले नाही. जुलैमध्ये इंग्लंड दौरा खेळल्यानंतर त्याने काही दिवसांची विश्रांती घेतली आणि आशिया चषकासाठी सज्ज झाला. आशिया चषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने 35 धावा केल्या होत्या. तसेच हाँगकाँगविरुद्ध अर्शशतक ठोकले. सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
पाकिस्तानविरुद्धचा हा सामना भारतीय संघासाठी प्रतिष्ठेचा आहे. या सामन्यापूर्वी विराट ‘हाय एल्टीट्यूड मास्क’ घालून धावताना दिसला. हे मास्क घालून सराव केल्यानंतर फुफ्फूसची क्षमता आणि स्टॅमिना वाढतो. यूएईतील उष्ण वातावरणात इतर खेळाडूंपेक्षा हा अधिकचा सराव केल्यामुळे विराटला ताजेतवाने राहण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. संघाचे सराव सत्र संपल्यानंतर विराट हा सराव करत होता. व्हिडिओत पाहायला मिळते की, सपोर्ट स्टाफच्या निदर्शनात तो हा सराव करत आहे. यादरम्यान तो स्वतः वेळवर लक्ष ठेवताना दिसला.
Virat Kohli using a high-altitude mask during cardio training today
This man's dedication is next level#ViratKohli𓃵 #viratkholi #KingKohli #TeamIndia #IndianCricketTeam #OneCricket pic.twitter.com/hxX5yFIbDQ
— OneCricket (@OneCricketApp) September 2, 2022
सुपर पोरमध्ये भारताचा पहिला सामना फाकिस्तानसोबतच आहे, जो रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर खेळला जाईल. त्यानंतर भारताला सुफर फोरमधील दुसरा सामना 6 सप्टेंबर रोजी श्रीलंकन संघाविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर भारतीय संघ 8 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानशी भिडणार आहे. भारताने जर सुपर फोरमधील दोन सामने जिंकले, तर संघ अंतिम सामन्यात पोहोचण्याची शक्यता अधिक आहे. आशिया चषकाचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताची चिंता शिगेला! पाकिस्तानला मिळालाय नवा पावर हिटर, 233च्या स्ट्राईक रेटने केलीय फटकेबाजी
‘बाबर आझमच क्रिकेटचा खरा किंग!’ हाँगकाँगच्या कर्णधाराने केलेल्या ट्वीटमागील सत्य समोर
उधारीची बूटे अन् अमर्यादित कष्ट! पाकिस्तानी घातक गोलंदाजाचा रोमांचक प्रवास उलघडला