इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाचा फाडशा पाडत अंतिम सामन्यात प्रवेश केला. बंगलोर हा सामना हरले, मात्र, संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने या सामन्यादरम्यान खेळभावनेचे अलौकिक दर्शन घडवले. विराटचा ही खेळभावना बघीतल्यानंतर चाहत्यांसह अनेक जणांनी विराटचे कौतुक केले.
झाले असे की, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंड बोल्टच्या (Trend Boult) षटकातील दुसरा चेंडू विराट कोहलीने (Virat Kohli) स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. जॉस बटलरने (Jos Buttler) चेंडू रोखला आणि नॉन-स्ट्रायकिंग एंडला झटपट मारला. पण स्टंपऐवजी धाव घेत कोहलीच्या पॅडला आदळल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. विराट त्यावेळी दुसरी धाव काढू शकत होता, मात्र त्याने धाव घेण्यास नकार देत खेळभावनेचे दर्शन घडवले. ही घटना सामन्याच्या पहिल्याच षटकात झाली.
नंतर, विराट फार काळ टिकू शकला नाही. तो केवळ ७ धावा करून प्रसिद्ध कृष्णाने टाकलेल्या चेंडूवर दुसऱ्या षटकात यष्टीरक्षक संजू सॅमसनकडे झेल देऊन बाद झाला.
Cause #SpiritOfCricket always remains gold! 👏 👏
Relive that special moment featuring @imVkohli. 👍 👍 #TATAIPL | #RRvRCB | @RCBTweets
Watch 🎥 🔽https://t.co/jZeGmbf7jP
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2022
https://twitter.com/SoniGup46462554/status/1530189384217415680
आयपीएल २०२२चा दुसरा क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावा केल्या. त्याचा पाठलाग करत राजस्थानने १८.१ षटकातच हे लक्ष्य साध्य केले.
दरम्यान, भारतीय संघ आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली चालू आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. या हंगामातील ही ७ वी वेळ आहे, जेव्हा विराट एक आकडी धावसंख्येवर बाद झाला आहे. विराटने एका आकडी धावसंख्येवर गमावलेल्या विकेट्सचा विचार केला, तर त्याने सात सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये शून्यावर विकेट गमावली आहे. या सात सामन्यांमध्ये त्याने ५, १, ०, ०, ९, ० आणि आता ७ अशी निराशाजनक कामगिरी केली आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
IPL प्लेऑफमध्ये वॉर्नरला पछाडत बटलरने दाखवला ‘जोश’! पाटीदारचाही विक्रमाच्या यादीत समावेश
बटलर मारण्यात अन् सिराज-हसरंगा षटकार खाण्यात आघाडीवर; RCBच्या गोलंदाजांचा नकोसा विक्रम
फायनलमध्ये चहलकडे इतिहास रचण्याची संधी, बनू शकतो सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज