भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएल २०२२मध्ये विशेष प्रदर्शन करू शकलेला नाही. या हंगामातील साखळी फेरीतील संघाचा चौदावा सामना वगळता त्याला इतर सामन्यांमध्ये धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. तो ३ वेळा गोल्डन डकचा (पहिल्याच चेंडूवर विकेट) शिकारही बनला आहे. मात्र गुजरात टायटन्सविरुद्धच्या अखेरच्या साखळी फेरी सामन्यादरम्यान धुव्वादार अर्धशतकी खेळी करत तो लयीत परतला आहे. या सामन्यानंतर विराटने आपल्या फॉर्मबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
जेव्हा आपण पुन्हा आधीसारख्या मोठ्या धावा करायला सुरुवात करू, तेव्हा आपल्याला खूप प्रेरणा मिळेल. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर आपण यावर्षी भारतीय संघाला आयसीसीच्या २ नव्या स्पर्धा जिंकून देऊ इच्छित असल्याचे विराटचे (Virat Kohli) म्हणणे आहे.
विश्वचषक जिंकण्यात मदत करायची आहे
स्टार स्पोर्ट्शी बोलताना विराट (Virat Kohli On His Form) म्हणाला की, “मला माहिती आहे की, मी जेव्हा चांगल्या धावा बनवू लागलेल, तेव्हा मला आपोआप प्रेरणा मिळत जाईल. माझी इच्छा आहे की, भारतीय संघाने आशिया चषक आणि टी२० विश्वचषक (T20 World Cup) जिंकावा आणि हीच माझ्यासाठी प्रेरणा असेल. मला संतुलन राखत किंवा थोडा आराम करत पुढे जायचे आहे. एकदा मी जेव्हा मानसिकतेत येतो, तेव्हा मी मागे वळून पाहात नाही. माझा प्रमुख उद्देश भारताला आशिया चषक आणि विश्वचषक जिंकून देण्यात मदत करणे, हाच आहे. ज्यासाठी मी काहीही करण्याची तयारी ठेवेन.”
विश्रांतीबद्दल काय म्हणाला विराट?
अनेक क्रिकेट विशेषज्ञांनी विराटला पुन्हा लयीत परतण्यासाठी क्रिकेटमधून काही दिवसांसाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. याबद्दल आपली प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला की, “ही निश्चितपणे एक अशी गोष्ट आहे, ज्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण तुम्ही असे काहीतरी करू इच्छित नाही, ज्याचा तुम्ही शंभर टक्के भाग नसता. त्यामुळे सुट्टी घेणे ही एक गोष्ट आहे ज्यावर मला कॉल घेणे आवश्यक आहे. शारिरीकरित्या मला सुट्टीची जास्त गरज नाहीय. परंतु मानसिकदृष्ट्या सुट्टीची आवश्यकता असते.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
गुजरातविरुद्ध आरसीबीच्या स्टार गोलंदाजाने का टाकले फक्त एकच षटक; धक्कादायक कारण आले समोर
वडिलोपार्जित घराला टाळा ठोकत गांगुली जाणार नव्या घरी, आलिशान बंगल्याची किंमत वाचून उडेल झोप
जेव्हा टीम डेव्हिडने निवडलेला सर्वोत्तम टी२० संघ; विराट, धोनीला दिली संधी, पण रोहितला…