कसोटी क्रिकेटमध्ये खेळणे ही प्रत्येक खेळाडूसाठी खूप मोठी गोष्ट असते. जर तो खेळाडू पदार्पण करत असेल, तर त्यातील त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असते. अशात जर तो गोलंदाज असेल आणि त्याने दिग्गज खेळाडूची विकेट घेतली, तर ती विकेट सदैव त्याच्या आठवणीत राहण्यासारखी असते. कसोटीत पदार्पणात एक-दोन नाही, तर तब्बल 5 गोलंदाजांनी विराट कोहली याची पहिली विकेट घेतली आहे. कोण आहेत ते गोलंदाज चला जाणून घेऊया…
सध्या दिल्ली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुह्नेमन (Matthew Kuhnemann) याने पदार्पण केले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघ 263 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताविरुद्ध दमदार गोलंदाजी करत विकेट्स काढल्या. भारतीय संघ 50.5 षटकात 7 विकेट्स गमावत 139 धावांवर खेळत होता.
या 7पैकी एक विकेट पदार्पणवीर मॅथ्यूने चटकावली होती. त्याने ही विकेट 50वे षटकातील तिसऱ्या चेंडूवर विराट कोहली (Virat Kohli) याची घेतली. विराट यावेळी 44 धावांवर खेळत होता. अशाप्रकारे विराटची विकेट ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्दीतील पहिली विकेट ठरली.
What a moment for Matt Kuhnemann! #INDvAUS pic.twitter.com/akzYLlDbeb
— cricket.com.au (@cricketcomau) February 18, 2023
फक्त मॅथ्यूच नाही, तर त्याच्यापूर्वी चार गोलंदाजांनी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या रूपात पहिली विकेट घेतली होती. त्यामध्ये पहिल्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) आहे. त्याने 2015मध्ये पदार्पण करताना विराटची पहिली कसोटी विकेट घेतली होती. त्यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ (Alzarri Joseph) आहे. त्याने 2016मध्ये पदार्पण करताना विराटची विकेट घेतली होती. यानंतर तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एस मुथूस्वामी याने 2019मध्ये कसोटी पदार्पणात विराटची विकेट घेतली होती. त्यानंतर त्याच वर्षी म्हणजे 2019मध्ये दक्षिण आफ्रिकेच्याच एन्रीच नॉर्किया याने विराटच्या रूपात पहिली कसोटी विकेट नावावर केली होती.
कसोटी पदार्पणात विराट कोहलीच्या रूपात पहिली विकेट घेणारे गोलंदाज
2015- कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)
2016- अल्झारी जोसेफ (वेस्ट इंडिज)
2019- एस मुथूस्वामी (दक्षिण आफ्रिका)
2019- एन्रीच नॉर्किया (दक्षिण आफ्रिका)
2023- मॅथ्यू कुह्नेमन (ऑस्ट्रेलिया)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मैदान भारताचं, पण हवा लायनची! कसोटीत ‘बाप’ कामगिरी करणारा नेथन दुसराच, पहिल्या स्थानी ‘हा’ भारतीय
आता बास झालं! फ्लॉप शोमुळे राहुल होणार कसोटी संघातून बाहेर? शेवटच्या 9 डावातील कामगिरी लज्जास्पद