---Advertisement---

नेदरलंड्सविरुद्धचे अर्धशतक ठरले विराटसाठी खूपच स्पेशल, वाढवली सचिन तेंडुलकरची डोकेदुखी

On: रविवार, नोव्हेंबर 12, 2023 5:15 PM
Virat Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली वनडे विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. रविवारी (12 नोव्हेंबर) भारत आणि नेदरलंड्स यांच्यात बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमना सामना झाला. उभय संघांतील ही लढत रंगतदार राहिली. भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि विराट कोहली याने अर्धशतकी खेळी केली. या प्रदर्शनासह विराटच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद देखील झाली.

नेदरलंड्सविरुद्ध विराटने वनडे विश्वचषक 2023 हंगामातील सातव्यांदा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली. सोबतच विराट एका विश्वचषक हंगामात सर्वाधिक वेळा 50पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. त्याने माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याची बरोबरी केली आहे. एकंदरीत विचार केला, तर विराट विश्वचषक हंगामात सात वेळा 50पेक्षा अधिक धावांची खेली करणारा तिसरा भारतीय ठरला आहे.

विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारे फलंदाज
7 – विराट कोहली (2023)*
7 – सचिन तेंडुलकर (2003)
7 – शाकिब अल हसन (2019)

दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील या सामन्याचा विचार केला, तर भारतासाठी सुरुवातीच्या पाचही फलंदाजांनी अप्रतिम खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा 61, शुबमन गिल 51 आणि विराट कोहली 51 धावा करून बाद झाले. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनीही 50+ धावांचे योगादन संघासाठी दिले.

महत्वाच्या बातम्या – 
चिन्नास्वामीवर घडला इतिहास! भारताच्या टॉप 5 ने करून दाखवली अद्वितीय कामगिरी 
‘मला माहितीच नव्हतं विराटनं…’, मेंडिसचा ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर यु-टर्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---