सध्या वनडे विश्वचषकात श्रीलंका संघाचे नेतृत्व कुसल मेंडिस करत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी मेंडिस आपल्या एका विधानामुळे चांगलाच चर्चेत आला होता. मेंडिसने या विधानात भारतीय दिग्गज विराट कोहली याच्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या होत्या. पण आता या प्रकरणाला काही दिवस उलटल्यानंतर मेंडिसने आपल्या विधानावरून यू टर्न घेतल्याचे दिसते.
दरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केली. हे विराटच्या वनडे कारकिर्दीतील 49वे शतक होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना 5 नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्सवर खेळला गेला होता. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 नोव्हेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील लढत दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार होती. तत्पूर्वी श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस पत्रकार परिषदेसाठी हजर राहिला होता.
पत्रकार परिषदेत मेंडिसला विराटच्या 49व्या षटकाविषयी प्रश्न विचारल्यानंतर श्रीलंकन कर्णधार काहीसा नाराज दिसला आणि त्याने अनपेक्षित उत्तर दिले. आता या प्रकरणानंतर जवळपास एका आठवड्याने मेंडिसने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मेंडिस म्हणाला, “मी त्यादिवसी श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या पत्रकार परिषदेसाठी गेलो होतो. मला माहीत नव्हते की विराटने शतक केले आहे. अशात त्या पत्रकाराने अचानक विराटविषयी प्रश्न विचारला. तो काय म्हणतोय हे मला माहीत नव्हते. मला प्रश्न देखील स्पष्ट ऐकू आला नव्हता.”
मेंडिस पुढे असेही म्हणाला की, “49 वनडे शतके करणे सोपी गोष्ट नाहीये. विराट जगातील अप्रतिम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मला नंतर समजले की, मी जे बोललो ते चुकीचे होते. मी अजूनही स्वीकार करतो की, मी जे बोललो ते चुकीचे होते. अजूनही मला त्यासाठी वाईट वाटत आहे.”
दरम्यान, विराटच्या 101* धावांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध या सामन्यात 326 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रविंद्र जडेजा याने विकेट्सचे पंचक घेतले आणि अवघ्या 83 धावांवर आफ्रिकी संघ सर्वबाद झाला. भारताने या सामन्यात 243 धावांनी विजय मिळवला होता. भारताला आता विश्वचषकाचा उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. तसेच स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. (Kusal Mendis’ explanation on his statement about Virat Kohli)
महत्वाच्या बातम्या –
एकच मारला अन् इतिहास घडला! रोहितने मोडून टाकला डिविलियर्सचा जबरदस्त रेकॉर्ड, बनला टेबल टॉपर
बिग ब्रेकिंग! ‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा