भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने संपूर्ण क्रिकेट जग ‘हिटमॅन’ का म्हणतात, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. रोहितने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात रविवारी (दि. 12 नोव्हेंबर) नेदरलँड्सविरुद्ध विक्रमांचे मनोरे रचले. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअम येथे रंगलेल्या या सामन्यात रोहितने एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. याबाबतीत त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स याचाही विक्रम मोडीत काढला.
विक्रमवीर रोहित शर्मा
या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामीला उतरला होता. यावेळी रोहितने 8 षटकांचा खेळ होईपर्यंत 30 चेंडूत नाबाद 37 धावांची खेळी केली. यामध्ये 1 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. रोहितने हा षटकार सातव्या षटकातील कॉलिन एकरमन याच्या चौथ्या चेंडूवर मारला. हा षटकार मारताच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.
https://twitter.com/BCCI/status/1723627059174588451
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने अव्वलस्थान पटकावले. रोहित शर्मा 59 षटकार (Rohit Sharma 59 Sixes) मारण्यात यशस्वी झाला. या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या स्थानी एबी डिविलियर्स असून त्याने 2015मध्ये संपूर्ण वर्षात 58 षटकार मारले होते. त्यामुळे अशात आता रोहित डिविलियर्सला मागे टाकत पुढे गेला आहे. यादीतील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल आहे. त्याने 2019मध्ये 56 षटकारांची बरसात केली होती. याव्यतिरिक्त यादीतील चौथे नाव पाकिस्तानी आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने 2002मध्ये 48 षटकार मारले होते. तसेच, पाचव्या स्थानी यूएईचा खेळाडू मोहम्मद वसीम असून त्याने 2023मध्येच 47 षटकार मारले आहेत.
https://twitter.com/rgcricket/status/1723627053252043251
एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
59* – रोहित शर्मा (2023)*
58 – एबी डिविलियर्स (2015)
56 – ख्रिस गेल (2019)
48 – शाहिद आफ्रिदी (2002)
47- मोहम्मद वसीम (2023) (hitman Rohit Sharma now smashed 59 sixes in 2023 which is most by any player in ODI Cricket history)
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! ‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा
CWC 23: बंगळुरूत रोहित ‘टॉस का बॉस’, अखेरच्या सामन्यात दोन्ही संघात कुठलाच नाही बदल