---Advertisement---

स्पर्धेतील खराब प्रदर्शनानंतरही बाबरला मिळाला पाठिंबा, संचालक म्हणाला, ‘तो अजूनही शिकतोय…’

On: रविवार, नोव्हेंबर 12, 2023 3:41 PM
Babar-Azam-And-Micky-Arthur
---Advertisement---

पाकिस्तान संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला नाही. त्यांना अखेरच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 93 धावांनी पराभूत व्हावे लागले. हा त्यांचा स्पर्धेतील पाचवा पराभव ठरला. पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी राहून त्यांनी स्पर्धेचा शेवट केला. पाकिस्तान स्पर्धेबाहेर होताच चाहते आणि माजी खेळाडूंनी कर्णधार बाबर आझम याच्यासह संघावरवर टीकास्त्र डागले. मात्र, या पराभवानंतरही पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी बाबरला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, ते अजूनही बाबरला पाठिंबा देत आहेत. तसेच, बाबर प्रत्येक सामन्यातून शिकत आहे.

पाकिस्तान संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत 9 सामने खेळले. त्यापैकी 4 सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले, तर 5 सामन्यात त्यांनी पराभव पत्करला. यामुळे त्यांना उपांत्य फेरीला मुकावे लागले. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला अखेरच्या सामन्यात इंग्लंडला मोठ्या अंतराने पराभूत करणे गरजेचे होते, पण ते असे करू शकले नाहीत. संघाच्या या खराब प्रदर्शनानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे.

‘बाबर आझम एक कर्णधार म्हणून शिकतोय’
बाबर आझम याच्या नेतृत्वाविषयीदेखील खूपच टीका केली जात आहे. मात्र, मिकी आर्थर (Micky Arthur) यांनी त्याचा बचाव केला. त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मोठे भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही एक खूपच चांगला संघ होतो. मी बाबर आझमसोबत आहे. तो माझ्या खूपच जवळ आहे. त्याला सातत्याने संधी देण्याची गरज आहे. तो अजूनही शिकत आहे आणि एक शानदार फलंदाज आहे. आपल्या नेतृत्वात तो दरदिवशी शिकत आहे. जेव्हा तुम्ही खेळता, तेव्हा चुका होतातच. चुका करणे गुन्हा नाही. तुम्ही त्या चुकातून शिकता. एक संघ म्हणून आम्ही विश्वचषकात खूप चुका केल्या आहेत. मात्र, जर हा संघ यातून शिकला, तर आम्ही खूपच चांगला संघ बनू शकतो.”

खरं तर, पाकिस्तान संघ त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडविरुद्ध 93 धावांनी पराभूत झाला. यासोबतच त्यांचा स्पर्धेतील प्रवासही संपुष्टात आला. त्यामुळे संघावर सडकून टीका केली जात आहे. स्पर्धेतील बाबरच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 9 सामन्यात 40च्या सरासरीने 320 धावा केल्या आहेत. (pakistan director mickey arthur backs babar azam after out from world cup 2023)

हेही वाचा-
एकच मारला अन् इतिहास घडला! रोहितने मोडून टाकला डिविलियर्सचा जबरदस्त रेकॉर्ड, बनला टेबल टॉपर
बिग ब्रेकिंग! ‘हिटमॅन’ने बंगळुरूत घडवला इतिहास, सलामीवीर म्हणून चोपल्या ‘एवढ्या’ इंटरनॅशनल धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---