भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य देशांमध्ये शुक्रवारपासून (१८ जून) विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना साउथॅम्प्टनच्या रोज बाऊल मैदानावर खेळला जाणार आहे. या मोठ्या सामन्यासाठी विराट कोहलीची सेना सज्ज झाली आहे. या सामन्यात विराट दिग्गज खेळाडूला मागे टाकत, मोठा कीर्तीमान आपल्या नावावर करणार आहे.
विराट कोहलीने गेल्या काही वर्षांपासून फलंदाजीमध्ये अनेक उच्चांक गाठले आहेत. तसेच कर्णधार म्हणूनही त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आज विराटच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. तो पहिल्या वहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मैदानात पाऊल ठेवताच तो एमएस धोनीला माघारी टाकत, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा कर्णधार ठरणार आहे. परंतु विराटला अजूनपर्यंत आयसीसीची एकही स्पर्धा जिंकण्यात यश आले नाही. त्यामुळे या सामन्यात त्याला आयसीसी चषक जिंकण्याची देखील संधी असणार आहे. (Virat Kohli will break MS dhoni record in WTC final)
विराटने २०१४ मध्ये, भारतीय संघाचे नेतृत्वपद स्वीकारले होते. त्याने आतापर्यंत एकूण ६० कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये ३६ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे, तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ६० सामन्यांपैकी २७ सामन्यात विजय मिळवला होता. विराटला हा कारनामा इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत देखील करता आला असता, परंतु त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर माघार घेतली होती. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होताा.
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या-
पहिलीवहिली कसोटी चॅम्पियनशीप फत्ते करण्यासाठी कर्णधार कोहलीने बनवला ‘हा’ मास्टरप्लॅन, वाचा
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात ‘हे’ भारतीय शिलेदार बलाढ्य न्यूझीलंडचा उडवतील धुव्वा!
दुर्दैवच म्हणावे! WTC फायनलमध्ये ‘हा’ अंपायर भारतासाठी अनलकी, यापुर्वी ४ विश्वचषकात नडलाय