मुंबई । बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर क्रिकेट चाहत्यांना आयपीएलचा आनंद लुटता येणार आहे. पुढच्या महिन्यात 19 सप्टेंबरपासून आयपीएलचा 13 वा हंगाम यूएईमध्ये सुरू होणार आहे. आयपीएलसाठी अनेक संघ दुबईला पोहोचले आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरही शुक्रवारी दुबईला पोहोचला आहे. दरम्यान कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा होत होती. याप्रकरणी आता संघाच्या अध्यक्षांनी मोठे विधान केले आहे.
आरसीबीचे अध्यक्ष संदीप चुरीवाला यांनी नुकतेच म्हटले, ”विराट भारतीय संघाचा कर्णधार असून त्याचे सर्वाधिक चाहते आहेत. आम्ही विराटवर खूप प्रेम करतो आणि त्याच्याशी जोडल्याचा आम्हाला आनंद आहे. कधी आपण जिंकतो, तर कधी पराभूत होतो, पण एक चाहता आणि आरसीबीचा मालक म्हणून मला विराटचा अभिमान आहे.”
संघ निवडीबद्दल बोलताना ते म्हणाले की, “खेळाडूंना संघात सामील करताना कोअर टीम तयार करण्यात येईल. प्रत्येक सामन्यात प्रत्येक खेळाडूची भूमिका असते, मग आपण अंतिम ११ चा भाग असो किंवा मग संघातून बाहेर. संघातील कमकुवत दुवे त्याला माहीत झाले आहेत आणि यावर तो काम करत आहेत.”
आरसीबीने तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ एकदासुद्धा आयपीएलचा चॅम्पियन होऊ शकलेला नाही. परंतु संघाने 3 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 2009, 2011 मध्ये डॅनियल व्हिटोरी आणि 2016 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. गेल्या तीन हंगामांत संघाची कामगिरी खराब झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने रचला धावांचा डोंगर; पाकिस्तान पुन्हा ‘बॅकफूट’वर
ट्रेंडिंग लेख-
-आपल्या समालोचनातून चौफेर फटकेबाजी करणारा ऍलन विल्किंंस
-क्रिकेटपटू म्हणून नाव कमावूनही नेहमीच स्वत: ला एक शिक्षक मानणारा क्रिकेटर
-जेव्हा भारतीय क्रिकेटचे पितामह रणजीतसिंग यांनी एकाच दिवशी केली होती २ शतके…