भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधारांपैकी एक आहे .विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केले आहे. तसेच गेली ५ वर्षे भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी संघाच्या यादीत अव्वल स्थानावर होता. परंतु त्याला अजूनपर्यंत एकही आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याच्याकडे आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची नामी संधी होती. परंतु या सामन्यातही त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्या नेतृत्वावर टीका केली जात आहे.अशातच माजी भारतीय फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी विराटच्या नेतृत्त्वाबाबत आपली बाजू मांडली आहे.
विश्वचषक २०१९ स्पर्धेत विराट कोहलीसोबत काम करणाऱ्या संजय बांगर यांनी त्याला समर्थन दर्शवले आहे. त्यांनी स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात म्हटले की, “एका संघनायकावर संघाला पुढे घेऊन जायची आणि चांगली कामगिरी करून घेण्याची जबाबदारी असते. मला यात काहीच शंका नाही की, विराट कोहली क्रिकेटच्या इतिहासात इतर कुठल्याही कर्णधारापेक्षा जास्त कालावधीसाठी संघाचे नेतृत्व करेल.”
कोहलीने २०१४-१५ मध्ये आस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाच्या कर्णधाराची जबाबदारी स्वीकारली होती. त्याने आतापर्यंत ६१ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या ५ वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. (Virat Kohli will end up captaining more than anyone else in history says former india batting coach sanjay bangar)
कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून ११ कसोटी मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत भारतीय संघाने २-२ मालिकेत विजय मिळवले आहेत. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ३६ कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. तर १४ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने ६० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यामध्ये २७ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले होते. तर १८ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या-
‘फलंदाजीवर लक्ष दिले असते तर आयपीएलमधून बक्कळ पैसा कमावला असता,’ अव्वल गोलंदाजाला खंत
ये करके दिखाओ! पठ्ठ्याने गोल फिरत उलट्या हाताने मारला जबराट शॉट, प्रसिद्ध समालोचकही फिदा
‘धोनी’च्या नावाने शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज, ‘तेंडुलकर’ला बनवले वडील; अज्ञात व्यक्ती संकटात!