एडलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने त्याचे वन-डे क्रिकेटमधील 39वे शतक ठोकले. हे त्याचे 64 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. कोहली आणि यष्टीरक्षक-फलंदाज एमएस धोनी यांच्या अप्रतिम खेळीमुळे भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशा बरोबरी करता आली.
कोहली ऑस्ट्रेलियामध्ये वन-डेत शतक करणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. वन-डे क्रिकटमध्ये त्याने सातत्याने उत्तमच कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी त्याचे कौतुक केले आहे.
“वन-डेमध्ये विराटने सातत्य कायम राखले आणि तो असाच फीट राहिला तर नक्की 100 आतंरराष्ट्रीय शतक करेल. सध्याही तो अनेक दिग्गज खेळाडूंच्या तुलनेत पुढे आहे”, असे अझरुद्दीन सांगितले आहे.
कोहली बरोबरच अझरुद्दीन यांनी धोनीचेही कौतुक केले आहे. धोनीने या सामन्यात 55 धावा करण्याबरोबरच विराटबरोबर चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली होती. तसेच त्याने पाचव्या विकेटसाठी दिनेश कार्तिकबरोबर नाबाद 57 धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला होता.
“या सामन्यात धोनी थकला असताना सुद्धा त्याने फलंदाजी केली. कोहली बाद झाल्यावर त्याने मोठे शॉट्स न खेळता एकेरी- दुहेरी धावा घेण्यावर सर्वाधिक भर देत दिनेश कार्तिकसोबत महत्त्वाची भागीदारी केली”, असे अझरुद्दीन म्हणाले.
“जर तुम्ही संघात नसले तर स्थानिक क्रिकेटमध्ये खेळून तुमचा फॉर्म कायम राखू शकता. मात्र धोनीने असे न केल्याने त्याला पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना अडचणी येत होत्या”, असेही अझरुद्दीन पुढे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
–बोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी
–जेव्हा कॅप्टन कूल एमएस धोनी खलील अहमदला वापरतो अपशब्द
–मुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा





