भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली आणि भारताने या सामन्यात डकवर्थ लूईस नियमानुसार मिळवलेल्या 59 धावांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
मागील 11 डावांनंतर विराटने वनडेमध्ये शतक केले आहे. विराटच्या या शतकी खेळीनंतर त्याचे अनेकांनी कौतुक केले. भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफरनेही विराटचे कौतुक करताना तो वनडेत 75-80 शतके करेल अशी भविष्यवाणी केली आहे.
विराटने या सामन्यात 125 चेंडूत 120 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटचे हे वनडे क्रिकेटमधील 42 वे शतक आहे. तसेच तो सध्या वनडेत सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत सचिन तेंडुलकर नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिनने वनडेत 49 शतके केली आहेत.
विराटने 42 वे शतक केल्यानंतर जाफरने ट्विट करत विराटचे कौतुक केले. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘विराटची 11 डावांच्या विश्रांतीनंतर नियमित/सामान्य सेवा पुन्हा सुरु झाली आहे. ती सेवा म्हणजे विराटने आणखी एक आंतरराष्ट्रीय शतक केले. माझ्या अंदाजानुसार किंग कोहली 75-80 वनडे शतके करेल.’
Normal services resumes after a break of 11 innings!!
i.e. another international 💯 for Virat Kohli 👏🏽
My prediction is he will get 75-80 ODI 💯's 🤞🏽🤐#KingKohli— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 12, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश; आयसीसीने केली मोठी घोषणा
–…तर टीम इंडियाचे कसोटीतील अव्वल स्थान येणार धोक्यात
–या सहा दिग्गजांपैकी एक होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक!