fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

या सहा दिग्गजांपैकी एक होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक!

भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने सहा अंतिम उमेदवारांची निवड केली आहेत. यामध्ये भारताचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री, माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमन्स, लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग यांनी निवड झाली आहे.

या सहा जणांची मुलाखत बीसीसीआयची सल्लागार समीती 16 ऑगस्टला घेणार आहे. या सल्लागार समीतीमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश आहे.

याबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, ‘हे सहाजण मुख्य प्रशिक्षक पदासाठी सल्लागार समीतीला प्रेसेंटेशन देतील. या सहाजणांची सल्लागार समीतीबरोबर मुलाखत देण्यासाठी अंतिम निवड करण्यात आल्याचे समजले आहे.’

मुख्य प्रशिक्षकाची निवड सल्लागार समीती करणार असून अन्य सपोर्ट स्टाफची निवड भारतीय संघाच्या निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद करतील.

भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर संपणार आहे. त्यांच्या करारात 2019 विश्वचषकानंतर 45 दिवसांची वाढ करण्यात आली होती.

भारतीय संघाच्या मुख्यप्रशिक्षक पदासाठी अंतिम 6 उमेदवारांच्या यादीत समावेश असलेले मूडी हे ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू असून त्यांनी आयपीएलमध्ये मागील 6 वर्षे सनरायझर्स हैद्राबाद संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबादने 2016 आयपीएलचे विजेतेपद तसेच 2018 च्या आयपीएलचे उपविजेतेपद मिळवले आहे.

त्याचबरोबर हेसन हे न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने 2015 च्या विश्वचषकात उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच हेसन यांनी किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे.

तसेच राजपूत हे याआधी 2007 च्या टी20 विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचे संघ व्यवस्थापक होते. तसेच त्यांनी झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले आहे. तर सिमन्स 2019 विश्वचषकात अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षक होते.

रॉबिन सिंग हे बराच काळ मुंबई इंडियन्सचे सहाय्यक प्रशिक्षक होते. तसेच 2007-2009 दरम्यान त्यांनी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या देशाच्या सर्वाधिक खेळाडूंनी खेळले आहेत ३००पेक्षा अधिक वनडे

…म्हणून विराट कोहलीसाठी हे शतक महत्त्वाचे होते

जेव्हा फलंदाज विराट कर्णधार विराटचे नाव इतिहासात लिहीतो

You might also like