भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके आहेत. त्याने आपल्या अनेक खेळींमुळे भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याचे शॉट्सचे आज अनेक खेळाडू अनुकरण करताना दिसतात. परंतु स्वत: विराटला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पॅडल स्कूप शॉटची चोरी करायची आहे.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) आणि कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत संवाद साधला. यादरम्यान विराटने सुनीलला अनेक प्रश्न विचारले. तसेच विराट म्हणाला की, त्याला सचिनचे (Sachin Tendulkar) पॅडल स्कूप फटके चोरायचे आहेत.
सुनीलने त्याला प्रश्न विचारला की जर शेवटच्या चेंडूवर ३ धावांची आवश्यकता असेल तर वकार युनूस आणि शेन वॉर्नपैकी कोणत्या गोलंदाजाची निवड करेल. यावर प्रत्युत्तर देत विराटने युनूसचे नाव घेत म्हटले की, त्याला विश्वास आहे की, तो युनूसच्या गोलंदाजीवर नक्कीच फटकार मारेल.
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनीलने विराटला प्रश्न विचारला की, तुला खेळायची असलेली ती आंतरराष्ट्रीय खेळी कोणती आहे?, यावर प्रत्तुत्तर देताना विराट म्हणाला की, त्याला २२ एप्रिल १९९८ला शारजाहमध्ये (Sharjah) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सचिनने खेळलेली तूफान खेळी खेळायची आहे.
हाच तो सामना आहे, ज्यामध्ये भारताला अंतिम सामन्यात (फायनल) पोहोचण्यासाठी विजय मिळविण्याची आवश्यकता होती. तसेच पराभवदेखील कमी अंतराने मिळायला हवा होता आणि सामन्यादरम्यान भयानक वादळ आले होते. सर्व खेळाडू मैदानावर झोपले होते. परंतु तो एकमेव खेळाडू होता जो त्या वादळातही उभा राहिला होता.
यानंतर सचिनने १४३ धावांची तूफान खेळी करत भारताला अंतिम सामन्यात पोहोचवले होते. तरीही भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नव्हता. परंंतु तो पराभव केवळ २६ धावांनी मिळाला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वनडे सामन्यांमध्ये ‘हॅट्रिक’ घेणार भारताचे ४ दिग्गज गोलंदाज
-संघात निवड होण्यासाठी विराटकडे मागितले होते पैसे
-टॉप ५: वनडे डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू