भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आज (१७ ऑक्टोबर) ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला अनेक आजी-माजी खेळाडूंनी तसेच अनेक सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण यासर्वांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिलेल्या शुभेच्छांमुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
विराटने कुंबळेला शुभेच्छा देताना लिहिले आहे की, ‘अनिल भाई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तूमचा दिवस चांगलो जावो.’
https://twitter.com/imVkohli/status/1317342699289112577
अनेकांना विराटने कुंबळेला शुभेच्छा देण्याचे आश्चर्य वाटण्यामागे कारण असे की २०१७ ला कुंबळे आणि विराटमधील संबंध बिघडले होते. त्यामुळे विराटने कुंबळेला प्रशिक्षकपदावरुन हटवण्याचीही मागणी केली होती. या प्रकरणामुळे कुंबळेने जून २०१७ मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. कुंबळेनंतर रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
या प्रकरणानंतर विराटने गेल्या ३ वर्षात कुंबळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या. पण आता अचानक ३ वर्षांनंतर विराटने दिलेल्या शुभेच्छा पाहून त्यांच्यातील संबंध सुधारले असल्याची शक्यता आहे.
तसेच अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल विराटचे कौतुक केले आहे, तर काहींनी काही मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने तर विराटचे ट्विटर अकाउंट हॅक तर झाले नाही ना, असे विचारले आहे.
https://twitter.com/AMP86793444/status/1317344592111538177
https://twitter.com/singintherainn/status/1317348776592338944
https://twitter.com/SaiKingkohli/status/1317344105781866496
https://twitter.com/sagarcasm/status/1317344033656754177
https://twitter.com/AnshumaNot/status/1317343298684547072
https://twitter.com/wingsoffly/status/1317344916964405250
https://twitter.com/absolutesatya/status/1317349822119120897
https://twitter.com/RAMESHWARAM16/status/1317355881407733765
https://twitter.com/ROHITMI96409226/status/1317370485462638593
https://twitter.com/FanBoyOfAA1/status/1317344106561953797
https://twitter.com/avinashsai10/status/1317344444979367936
https://twitter.com/paksa7158/status/1317343876164644864
सध्या विराट आणि कुंबळे दोघेही आयपीएल २०२० निमित्त युएईमध्ये आहेत. विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार आहे. तर कुंबळे किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-एकेकाळी विराटने ज्याला प्रशिक्षक म्हणून नाकारले, शेवटी त्यानेच दाखवून दिले
IPL 2020: आज राजस्थान-बेंगलोर आणि दिल्ली-चेन्नई येईल आमने सामने, जाणून घ्या सामन्यांबद्दल सर्वकाही
मी काही केलंच नाही! तुषार देशपांडेला धक्का दिल्यामुळे श्रेयस झाला ट्रोल
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष




