---Advertisement---

ईद मुबारक! भारतीय कर्णधार विराट कोहलीने ‘या’ संदेशासह देशवासीयांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

On: शुक्रवार, मे 14, 2021 12:20 AM
---Advertisement---

जगभरातील अनेक देशात रमजान ईद साजरी केली जात आहे. त्याच निमित्ताने अनेक सेलिब्रेटिंनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात भारतीय संघाचा कर्णधार आणि वर्तमान क्रिकेटमधील एक आघाडीचा फलंदाज विराट कोहलीचाही समावेळ आहे. त्यानेही ईदच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटने सोशल मीडियावर एक खास संदेश शेअर केला आणि कोरोनाच्या या कठीण काळात सर्वांना सुरक्षित रहाण्याचे आवाहनही केले. आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्यापासून विराटसह अन्य खेळाडूही आपापल्या घरी परतले आहेत आणि कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत.

विराटने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “या कठीण काळात ईदचा हा आनंदी उत्सव सर्वांना प्रेम, शांती आणि आनंद मिळवून देवो. ईद मुबारक. सुरक्षित रहा”.

सध्या भारतात अनेक लोक प्राणघातक कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेले आहेत आणि दररोज सुमारे 3 लाख नवीन रुग्ण सापडत आहेत. तथापि, कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा दर कमी झाला असून ती एक मोठी दिलासा दायक बाब आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत विराटकडूनही मदत
कोरोना विरूद्धच्या लढ्यात विराट देखील पुढे आला आहे. विराट आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कोरोना काळात मदत करत आहेत. विराट व अनुष्का या दोघांचेही एका मोहिमेअंतर्गत कोरोना काळात 7 कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट होते, नंतर ते वाढवून त्यांनी 11 कोटी केले होते. आनंदाची बाब म्हणजे बुधवारपर्यंत 11 कोटी रुपये जमाही झाले. विराट आणि अनुष्काने यांनी दोन कोटी रुपये दिले आहेत, तर पाच कोटी रुपये एमपीएल स्पोर्ट्स फाऊंडेशनने दिले आहेत. ही रक्कम देशात कोरोना विरुद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी वापरली जाणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई इंडियन्सला पोलार्ड नावाचा हिरा ब्राव्होने दिलाय! त्याचीच ही कहाणी

‘कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मला भीती वाटली होती’, साहाने सांगितला स्वानुभव

यजुवेंद्र चहलच्या घरी कोरोनाचा शिरकाव! आई अन् वडील दोघेही कोव्हिड पॉझिटिव्ह, ‘या’ नातेवाईकांचे झाले निधन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---