IND vs ENG Test: इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला असून संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. बीसीसीआयने विराट गेल्याची माहिती दिली आणि वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचेही सांगितले. याशिवाय बदलीची घोषणा लवकरच केली जाईल, असे बीसीसीआयने सांगितले.
विराट कोहली याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी आयडीएफसी फर्स्ट बँक कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याची विनंती केली आहे, असे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी बोलले आहे आणि यावर भर दिला आहे की, देशाचे प्रतिनिधित्व करणे हे नेहमीच त्याचे सर्वोच्च प्राधान्य असते, काही वैयक्तिक परिस्थितीत त्याची उपस्थिती असणे म्हत्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. (virat kohli withdraws from first two tests against england citing personal reasons)
बीसीसीआयने त्याच्या निर्णयाचा आदर केला असून बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने स्टार फलंदाजाला पाठिंबा दिला आहे आणि उर्वरित संघाच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याच्या क्षमतेवर त्यांना विश्वास आहे. बीसीसीआय मीडिया आणि चाहत्यांना विनंती करते की, त्यांनी यावेळी विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करावा आणि त्याच्या वैयक्तिक कारणांबद्दल अंदाज लावण्यापासून दूर राहावे. कसोटी मालिकेतील आगामी आव्हानांना तोंड देत भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
इंग्लंड मालिकेपूर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी विराट कोहलीचीही संघात निवड करण्यात आली होती, परंतु त्याने पहिल्या सामन्यातून विश्रांती घेतली होती आणि त्यानंतरही वैयक्तिक कारणे सांगितली गेली होती. मात्र, 11 जानेवारीला त्याची मुलगी वामिकाचा वाढदिवस असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे या दिग्गज खेळाडूने ब्रेक घेतला होता. (Big blow for India ahead of Test series against England experienced players out for special reasons)
हेही वाचा
IPL 2024: आयपीएलचा 17वा सीझन 22 मार्चपासून होणार सुरू, तर 26 मे रोजी होईल फायनल
हार्दिक पंड्या मैदानात परतण्यासाठी घेतोय मेहनत, फोटो शेअर करून दिले संकेत