भारतीय क्रिकेट संघासह जगभरातील महान फलंदांपैकी विराट कोहली एक आहे. सध्याचे तरुण क्रिकेटपटू विराट कोहलीला फाॅलो करतात. खूप कमी काळात विराटने जगभरात प्रसिध्दी मिळवली आहे. विराट कोहलीने आपल्या शानदार कामगिरीने अनेक आयसीसी पुरस्कार जिंकले आहेत. ज्यामध्ये ज्यामध्ये 3 प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, 5 बीसीसीआय पुरस्कार आणि 10 आयसीसी पुरस्कारांचा समावेश आहे. चला तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात विराट कोहलीचे ते 10 आयसीसी पुरस्कार कोणते आहेत.
विराट कोहलीचे 10 आयसीसी पुरस्कार
तीन एकदिवसीय क्रिकेटपटू पुरस्कार
विराट कोहलीच्या नावावर तीन आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर खिताब आहेत. 2012 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला होता. यानंतर 2017 आणि 2018 मध्येही त्याने हे विजेतेपद पटकावले.
दोन वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार
विराट कोहलीला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार दोनदा मिळाला आहे. हा पुरस्कार क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधील कामगिरीच्या आधारे दिला जातो. विराट कोहलीने 2017 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला होता आणि 2018 मध्ये तो दुसऱ्यांदा हा किताब जिंकण्यात यशस्वी ठरला होता.
विराट कोहलीच्या नावावर आयसीसीचे पाच मोठे पुरस्कार
विराट कोहलीने 2018 साली सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूचा किताब पटकावला आहे. त्याने 2019 मध्ये स्पिरिट ऑफ द ईयरचा खिताब पटकावला आहे. याशिवाय विराट कोहलीने दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर आणि एकदिवसीय क्रिकेटपटूचा किताबही पटकावला आहे.
विराट कोहलीने कसोटी, एकदिवसीय, आंतरराष्ट्रीय टी20 आणि आयपीएल असे एकूण 785 सामने खेळले आहेत. या 785 सामन्यांमध्ये त्याने 34946 धावा केल्या आहेत.
कसोटी सामना: विराट कोहलीने 113 कसोटी सामने खेळले आहेत. या 113 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 55.6 च्या स्ट्राइक रेटने 8848 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 अर्धशतके आणि 29 शतकांचा समावेश आहे. नाबाद 254 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
एकदिवसीय सामना: विराट कोहलीने 295 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 295 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 93.5 च्या स्ट्राइक रेटने 13906 धावा केल्या आहेत. यामध्ये 72 अर्धशतके आणि 50 शतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 183 धावा आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 सामने: विराट कोहलीने 125 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. या 125 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये त्याने 137.0 च्या स्ट्राइक रेटने 4188 धावा केल्या आहेत. यामध्ये 38 अर्धशतक आणि 1 शतकाचा समावेश आहे. या फाॅरमॅटमध्ये 122* धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
आयपीएल सामना: विराट कोहलीने 252 आयपीएल सामने खेळले आहेत. या 252 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 132.0 च्या स्ट्राइक रेटने 8004 धावा केल्या आहेत. यामध्ये 55 अर्धशतके आणि 8 शतकांचा समावेश आहे. नाबाद 113 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
हेही वाचा-
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने निवडली टीम इंडियाची ऑलटाइम प्लेइंग-11, हा दिग्गज कर्णधार
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानला धक्का, WTC गुणतालिकेत भारताचा खेळ बिघडला?
गुजरात टायटन्स ‘या’ 3 स्टार खेळाडूंना लिलावापूर्वी करणार रिलीज?