येत्या १९ फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज (india vs West Indies) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ ३ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्मा (Rohit sharma) भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तसेच विराट कोहलीचे (Virat Kohli) वनडे संघाचे कर्णधारपद काढून घेतल्यानंतर रोहित शर्माची पूर्णवेळ कर्णधार म्हणून ही पहिलीच वनडे मालिका असणार आहे. दरम्यान या वनडे मालिकेपूर्वी विराट कोहलीच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. (Rajkumar Sharma)
विराट कोहलीने गेली ७ वर्ष भारतीय संघाचे नेतृत्व केले. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर त्याने टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत २-१ ने पराभूत झाल्यानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
अशातच विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना वाटते की, रोहित शर्मा हा विराट कोहलीची जागा घेण्यासाठी योग्य पर्याय आहे. त्यांचे म्हणणे आहे की, रोहित शर्मा तिन्ही स्वरूपात खेळतो. त्यामुळे तो विराट कोहलीचा उत्तराधिकारी होऊ शकतो.
इंडिया न्यूज सोबत बोलताना राजकुमार शर्मा यांनी म्हटले की, “मला नाही वाटत की, रोहित शर्माव्यतिरिक्त हे पद स्वीकारण्यासाठी दुसरा खेळाडू प्रबळ दावेदार असेल. कारण रोहित शर्मा तिन्ही स्वरूपात खेळतो. त्याने आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. तसेच जेव्हा जेव्हा त्याला संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाली आहे, तेव्हा त्याने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली आहे. मला आशा आहे की, तो भारतीय क्रिकेटला खूप उंचीवर घेऊन जाईल.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “संघ निवड करण्याची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे. कारण रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे विचार खूप जुळतात. निवडकर्त्यांनी देखील तोच संघ निवडला पाहिजे, जो कर्णधार आणि प्रशिक्षकाला हवा आहे.
“प्रत्येक कर्णधाराची आवड वेगळी असते. प्रत्येक कर्णधाराला आपल्या आवडीचा संघ हवा असतो आणि सहसा असेच होत असते. जर रोहित आणि राहुल यांचे विचार जुळले तर सर्व सोपं होऊन जाईल. “असे राजकुमार शर्मा म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
हे नक्की पाहा: