दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या (Johannesburg) मैदानावर सुरू आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिका आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. परंतु हा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ज्यामुळे केएल राहुलला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या चाहत्यांना त्याचा १०० वा सामना पाहण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत एकूण ९८ कसोटी सामने खेळले आहेत. जर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेला दुसरा कसोटी सामना खेळत असता, तर हा त्याचा ९९ व्या सामना असता. तसेच मालिकेतील अंतिम सामना हा त्याचा १०० वा सामना असू शकला असता. याचा अर्थ असा की, विराट कोहलीला त्याचा १०० वा सामना या मालिकेत खेळता येणार नाहीये.
केव्हा खेळणार विराट आपला १०० वा कसोटी सामना?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ मायदेशात वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी श्रीलंका संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे.
कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे खेळवला जाईल. तर दुसरा कसोटी सामना ५ मार्च ते ९ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना मोहालीत रंगणार आहे. जर कोहली या मालिकेत खेळला तर मालिकेतील पहिला कसोटी सामना हा त्याचा कारकिर्दीतील १०० वा सामना असेल.
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी
महत्वाच्या बातम्या :
ना धोनी, ना कोहली; भज्जीच्या ‘ऑल टाईम कसोटी प्लेइंग इलेव्हन’मध्ये फक्त ‘या’ २ भारतीयांची नियुक्ती
लहानग्या वामिकाने पहिल्यांदाच अनुष्काला म्हटले ‘मम्मा’; तिचा आवाज ऐकून म्हणाल, ‘किती गोड’!
हे नक्की पाहा :






